fbpx

Adversity quotient

तुम्ही आयुष्यात आलेले पेच प्रसंग कसे हाताळता ? आयुष्यात आलेली संकटे तुम्ही भोग म्हणून सहन करता की त्या संकटांचा सामना करता ? दैनंदिन जीवनात अनेक असे प्रसंग येतात ज्यामुळे आपला जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत जातो म्हणजेच आपण mature होत जातो. पण या संकटाना आपण कसे सामोरे जाणार हे आपल्या AQ वर अवलंबून असते. आज आपण याच AQ म्हणजे Adversity quotient बद्दल अधिक माहिती घेणार आहोत.

सर्वांना intelligence quotient (IQ) आणि Emotional quotient (EQ) याबद्दल माहिती आहेच. intelligence quotient (IQ) म्हणजे आपले ज्ञान, cognitive adility आणि तर्क यांची क्षमता तर Emotional quotient (EQ) म्हणजे भावना हाताळायची क्षमता. या दोन्हींना एकत्रितपणे development quotient असे म्हणतात.

Intelligence quotient (IQ) आणि Emotional quotient (EQ) हे व्यक्तीसाठी महत्वाचे आहेत. पण विपरीत परिस्थिती मध्ये आपले मानसिक स्वास्थ कसे असेल हे ठरवण्यात हे दोन development quotient असमर्थ ठरतात.

एखादी विपरीत परिस्थिती हाताळायची आपली क्षमता म्हणजेच आपला adversity quotient (AQ). जर एखाद्या व्यक्तीचे IQ, EQ आणि AQ चांगले असतील तर ती कोणत्याही कठीण परिस्थितीत स्वतःला योग्य प्रकारे सांभाळू शकते आणि परिस्थिती सोबत जुळवून घेऊ शकते तसेच चुकांमधून आपली प्रगती साधू शकते.

समजा आपण एखाद्या अडचणीत आहोत, अश्या वेळी आपला IQ त्यावर solution शोधतो, EQ भावना योग्य प्रकारे हाताळतो आणि जेव्हा आपण solution वर काम करताना भावना योग्य प्रकारे हाताळत असतो तेव्हा त्या अडचणीला कसे सामोरे जायचे हे आपला AQ ठरवतो असतो.

उदा. एडिसन ने बल्ब चा शोध लावताना बुद्धी वापरून अनेक मार्ग शोधले (IQ), त्यात अनेकदा अपयश आले पण तो तिथे रडला नाही, त्याने स्वतः च्या भावना उत्तम प्रकारे कंट्रोल केल्या (EQ) पण हे सर्व होत असताना जुन्या चुकांमधून त्याने कधीच स्वतःला blame केले नाही, किंवा हार मानली नाही. त्याने एक optimistic दृष्टिकोन निर्माण केला  (AQ) आणि शेवटी बल्बचा शोध लागला. त्याने शेवटी विधान केले की मी 1000 वेळा अयशस्वी झालो नाही तर उलट मी 1000 काम न करणारे मार्ग शोधले आहेत. हाच चुकांमधून शिकून पुढे जायचा attitude म्हणजेच आपला AQ असतो.

ज्यांचा AQ चांगला असतो ते खूप सहज चुकांमधून शिकतात आणि परिस्थिती सोबत जुळवून घेतात. यामुळे AQ ला science of resilience असे म्हणतात.

AQ आपल्या दैनंदिन जीवनासाठी खूपच महत्त्वाचा आहे, आपले coping mechanism हे पूर्णपणे आपल्या AQ वर अवलंबून असते. आपला IQ खूप छान आहे पण जर आपल्याला दैनंदिन समस्या सोडवणे कठीण जात असेल तर तो IQ व्यर्थ नाही का ?

Adversity quotient कसा विकसित करावा ?

विपरीत परिस्थिती हाताळायची पद्धत ही व्यक्तीनुसार वेगवेगळी असते. अनेकदा अशा परिस्थिती मध्ये आपण चुकीची कृती करतो आणि प्रोब्लेम अजून कठीण होतो. त्यामुळे आपण कसे react झालो याचे निरीक्षण करणे आणि त्यातील चुका ओळखणे खूपच गरजचे असते. म्हणून self awareness ही adversity quotient विकसित करण्याची पहिली पायरी समजली जाते. 

आपला AQ विकसित करण्याच्या 4 पायऱ्या आहेत.

✳️ Acknowledge It – कोणताही बदल करण्यासाठी आधी आपले काय आणि कुठे चुकले ते शोधणे आणि स्वीकारणे गरजेचे आहे. यात तुम्ही स्वतःची आणि जवळच्या लोकांची मते विचारात घेणे फायद्याचे ठरते.

✳️ Owning it – परिस्थिती स्वीकारली की survive करण्यासाठी आपल्याला आपल्यात बदल करणे आवश्यक आहे हे मनाशी पक्के करा. जेव्हा कधी पराभव किंवा समस्या समोर येतील तेव्हा निराश न होता त्यांची जबाबदारी घ्या आणि परिस्थिती सोबत जुळवून घ्या

✳️ समस्या सोडवा – जेव्हा एखादी परिस्थिती तुम्ही स्वीकारता, तिची जबाबदारी घेता आणि तीच्यानुसार स्वतः मध्ये बदल करता तेव्हा पुढे तिला हॅण्डल करण्यासाठी तुम्ही योग्य प्लॅन बनवू शकता किंवा तिचे solution शोधू शकता.

✳️ Application – समस्येचे जे solution तुम्ही शोधले आहे ते प्रत्यक्षात apply करून बघा.

या सर्व पायऱ्या योग्य प्रकारे पूर्ण केल्यास समस्येवर समाधान तर मिळतेच पण अपयशातून आपल्याला शिकायला देखील मिळते.

High Adversity quotient असणाऱ्या व्यक्तींमध्ये असणारे गुण .

✳️ चिकाटी

कितीही विपरीत परिस्थिती असली तरीही या व्यक्ती कधीही हार मनात नाहीत. अगदी extreme परिस्थिती मध्ये देखील यांचा उत्साह चांगला असतो.

तुमचा AQ समजून घेण्यासाठी इंटरव्ह्यू मध्ये पुढील प्रश्न विचारले जातात.
❤️ तुम्ही आधीच्या जॉब मध्ये कोणत्या समस्या अनुभवल्या ?
❤️ त्या समस्या तुम्ही कशा सोडवल्या ?
❤️ तुम्ही आधीची कंपनी का सोडली ? / सोडत आहात ?

✳️ अनुकूलता

आपल्या अवतीभोवती होणारे बदल सहज adapt करण्याची क्षमता या व्यक्तींमध्ये असते.   आपल्या कामात किंवा target मध्ये झालेले बदल ते त्रास किंवा त्रागा न करता स्वीकारू शकतात. पण याचे कोणतेही प्रेशर ते घेत नाहीत. जर कोणत्याही कामामुळे त्यांचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य खराब होत असेल तर ते योग्य प्रकारे manage करतात. त्यांना नाही बोलण्याची कला देखील अवगत असते.

✳️ नियंत्रण –

ज्यांचा AQ high असतो ते विपरीत परिस्थिती नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतात पण सर्वच कंडीशन कंट्रोल करण्यायोग्य नसतात अशा वेळी ते त्या परिस्थिती मध्ये extreme चॅलेंज चा सामना करून दुसऱ्यांना प्रभविक करणारे रिझल्ट देतात.

✳️ सहनशक्ती –

हे लोक कोणत्याही विपरीत परिस्थिती ला एक चॅलेंज समजतात आणि ही परिस्थिती तात्पुरती आहे असा विचार मनाशी पक्का करतात. यांचा breaking point सामान्य लोकांच्या तुलनेत जास्त असतो त्यामुळे हे इतरांच्या तुलनेत जात प्रेशर सहन करू शकतात.

ज्यांना आपल्या भावना नियंत्रित करता येत नाहीत, परिस्थिती सोबत जुळवून घेता येत नाही आणि बदल सहज स्वीकारता येत नाही ते नकारात्मक विचार करतात आणि उदास जीवन जगतात उलट जे adversity quotient विकसित करून आपण आपल्या क्षमता, मनोबल, वर्क परफॉर्मन्स, नावीन्य आणि productivity वाढवतात ते एक सकारात्मक आणि आनंदी आयुष्य जगतात.

ज्यांचा इमोशनल कोशंट उच्च असतो म्हणजे जे आपल्या भावना समजून घेतात आणि त्यांना योग्य प्रकारे manage करतात त्यांचा AQ हा सामान्य लोकांच्या तुलनेत जास्त असतो. पण AQ उच्च असणाऱ्या व्यक्तींचा EQ चांगला असेलच असे नाही.

Need Help ? Talk to the expert now !

Counselling Psychologist
Scroll to Top