fbpx

आत्मविश्वास वाढवायचे पंचम

आपले मनोबल आणि काम करण्याची प्रेरणा या आत्मविश्वासावर अवलंबून असतात, एखादे काम करताना आपण त्यात यशस्वी होणार की अयशस्वी हे देखील बहुतांशी आपल्या त्यावरच अवलंबून असते. सतत स्वतःवर संशय घेणारे अनेकदा अपयशाचा सामना करतात तर विश्वासाने काम करणारे यशाकडे पाऊले टाकत असतात. आजच्या लेखात आपण आपला आत्मविश्वास वाढण्याचे पाच वैज्ञानिक मार्ग पाहणार आहोत.

✳️ आपली सेल्फ वर्थ (किंमत) समजून घ्या.

आत्मविश्वास जागवण्यासाठी आपल्याला आपली value म्हणजेच किंमत माहीत असणे फारच आवश्यक आहे. आपण सर्वांना कुठेतरी वाटत असते की आपण काहीच deserve करत नाही, आपली योग्यता नाही किंवा आपण कुठेतरी कमी पडत आहोत पण वास्तविक असे काहीच नसते, प्रत्येक मनुष्य हा worthy असतोच.

अनेकदा आपले पालक, शिक्षक आणि समाज यांमुळे आपण स्वतःला worthless समजू लागतो. शिक्षकांकडून सतत तू मूर्ख आहेस हे ऐकणे, एखाद्या विशिष्ठ जातीत जन्माला आला म्हणून तू शूद्र आहेस किंवा निरुपयोगी आहेस असे सतत ऐकून आपण स्वतःची किंमत चुकीच्या पद्धतीने ठरवत असतो.

तर सर्व सामाजिक आणि अन्य लोकांची मते बाजूला ठेवून आपण आत्मपरीक्षण केले पाहिजे, त्यातून आपली सेल्फ वर्थ सहज लक्षात येऊ शकते आणि आपण कसे आहोत हे सहज स्वीकारता येऊ शकते.

✳️ आपल्या चांगल्या क्वालिटी समजून घ्या.

आत्मविश्वासाचा दुसरा मार्ग म्हणजे आपल्यात असलेल्या चांगल्या गुणांचा शोध घेणे, आपण अनेकदा आपल्याकडे असलेले गुण सोडून आपण कुठे कमी पडतो त्याचच विचार जास्त करत असतो. पण जर तेच आपण आपल्या गुणांवर लक्ष दिले तर आपला विश्वास सहज वाढू शकतो.

यासाठी निवांत बसून आपले गुण लिहून काढा आणि त्यांवर फोकस करा, त्यांचा वापर आपण कुठे कुठे करू शकतो याचे अवलोकन करा जेव्हा त्यामुळे इतरांना आणि तुम्हाला मदत होईल तेव्हा आपोआप विश्वास वाढीस लागेल.

✳️ आपल्या strength शोधण्याचा प्रयत्न करा.

एकदा आपल्यात असलेले गुण शोधले की आपल्यात असलेले strength शोधणे सोपे जाते. आपल्याकडे असलेले strength एकदा माहीत झाले की कशीही परिस्थिती असल्यास आपण त्यावर सहज मात करू शकतो. कठीण परिस्थितीवर आपण कशा प्रकारे मात केली आणि त्यात आपले कोणते strength कसे वापरले गेले हे समजले की मग आपल्याला स्वतःबद्दल एक विश्वास वाटू लागतो.

✳️ स्वतःबद्दल चांगला विचार करणे.

आत्मविश्वास वाढण्यासाठी आपण स्वतःबद्दल सकारात्मक विचार निर्माण करणे फारच अवस्याक असते, आपण सतत स्वतःला नकारात्मक दृष्टया पाहत असतो. छोटी चूक झाली तरी स्वतःला नाव ठेवणे, आपल्या कार्यक्षमतेवर प्रश्न उभे करणे अश्या गोष्टीतून आपले मनोबल कमी होते आणि स्वतःवर असलेला विश्वास कमी होऊ लागतो.

उदा. आपण खूप चांगले काम केले तरी आपला आतला आवाज म्हणतो की तू याहून चांगले काम करू शकत होतास अश्या वेळी मनाला सतत सांगायचे की मी पूर्ण प्रयत्न केले होते आणि माझ्यापरीने मी सर्व काही केले आहे, मला माझ्या कामावर विश्वास आहे. अशा सेल्फ टॉक ने आपण स्वतःला चांगले feel करून देऊन आत्मविश्वास वाढीस लावू शकतो.

✳️ आपले 100% देण्याचा प्रयत्न करा.

जेव्हा आपण कोणतेही काम करताना आपले पूर्ण प्रयत्न त्यात टाकतो तेव्हा कुणीही (अगदी आपला आतला आवाज देखील.) आपल्याला डाऊन फील करवत असेल किंवा नाव ठेवत असेल तरीही त्याला उत्तर देता येते की मी माझे 100% प्रयत्न केले होते, त्यामुळे सकारात्मक दृष्टिकोन राखला जातो आणि स्वतःवर असलेला विश्वास वाढतो.

पण 100% देणे म्हणजे perfection असणे अजिबात नसते, आपल्याला त्या परिस्थिती मध्ये जे काही करणे शक्य होते ते सर्व करणे म्हणजे आपले 100% देणे.

आपला आत्मविश्वास वाढवणे हे सोपे नसले तरी ते अशक्य अजिबात नाही, आपल्यात असलेले गुण, strength यांचा योग्य वापर केला आणि शक्य असलेले सर्व efforts आपण दिले की रिझल्ट्स चांगले येऊ लागतात आणि त्यातूनच मग आपला आत्मविश्वास वाढू लागतो.

Need Help ? Talk to the expert now !

Counselling Psychologist
Scroll to Top