fbpx

Conversation skill

conversation-junction
Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on skype
Share on whatsapp
Share on email
Share on print

1997 साली प्रोफेसर कॅटलिन करीको आणि डॉक्टर ड्रु वेईसमन हे एका फोटोकॉपीच्या दुकानात बोलत होते, त्यांच्या गप्पा रंगल्या आणि यातूनच Pfizer and Moderna च्या निर्मितीचा पाया घातला गेला. योग्य संभाषण आपले आयुष्य पूर्णपणे बदलू शकते. परंतु संभाषण कसे सुरू करावे आणि ते कसे पुढे सुरू ठेवावे याबाबत अनेक संभ्रम आपल्या मनात असतात. आजच्या लेखात आपण आपले संभाषण अर्थपूर्ण करण्याच्या काही सोप्या  पायऱ्या पाहू.

✳️ स्मार्टफोन हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे, साधारण 7 ते 8% लोक त्यांचा फोन दर 5 मिनिटांनी चेक करतात. पण जर तुम्ही कुणाशी संवाद साधत असाल तर फोन बाजूला ठेवा, जमल्यास तो silent मोड वर ठेवा किंवा खिशात/ पर्स मध्येच असू द्या. काही urgent काम असेल तर त्यांची परवानगी घेऊन फोन वापरा.

✳️ गॉसिप करू नका – जगात अनेक ठिकाणी अनेक घटना घडत असतात, अशा वेळी एखादी व्यक्ती तिथे नसताना त्यावर बोलणे टाळा. कारण समोरची व्यक्ती तुम्ही जजमेंटल आहात आणि तिच्या पाठी देखील तिने सांगितलेले बोलाल असा समज करून घेऊ शकते आणि मग तुमचा संवाद बंद होऊ शकतो.

✳️ जर तुम्हाला कुणा अनोळखी व्यक्ती सोबत बोलायचे असेल तर पहिल्या भेटीत नम्रपणे त्यांच्याबद्दल माहिती घ्या. “Tell me about yourself” या प्रश्नाने सुरुवात करा, म्हणजे समोरच्याला सहज कळते की तुम्ही त्यांच्यात interested आहात.

✳️ ऐकून घ्या – संभाषणाचा सर्वात मोठा भाग म्हणजे समोरच्याचे ऐकून घेणे, आपले बोलणे झाले की समोरचा काय बोलत आहे ते शांतपणे आणि लक्षपूर्वक ऐकून घ्या. तुम्ही त्यांना प्रतिप्रश्न देखील करू शकता जेणेकरून तुम्ही ऐकले आहे हे त्यांना समजेल.

✳️ संभाषण नदी प्रमाणे असते, ते तसेच नैसर्गिक असू द्या. अनेकदा आपल्या समोर येणारे प्रश्न आणि प्रसंग एकदम समोर येतात, अश्यावेळी मनापासून उत्तर द्या. संवाद साधताना अनपेक्षित वळणे येतील तेव्हा चिडचिड न करता त्यांचा आनंद घ्या.

✳️ काही दिवस लोटले की संवाद थोडा कंटाळवाणा होऊ लागतो, अशा वेळी काय बोलावे सुचत नाही किंवा आपण व्यक्ती ला इग्नोर करू लागतो. Hmm किंवा ok अशी उत्तरे मिळू लागतात. तेव्हा आपण काही इंटरेस्टिंग विषय काढून संवाद सुरू ठेवू शकतो. उदा – तुझा आवडता चित्रपट कोणता ?, तुला स्वप्न कोणत्या प्रकारची पडतात ?, तुझे आवडते कलाकार कोणते ? किंवा त्या व्यक्तीच्या कामाविषयी बोला.

✳️ अबोला – रोजच बोलणे व्हायला हवे असे गरजेचे नाही, कधीतरी छोटा ब्रेक देखील आवश्यक असतो. नेहमी आपणच बोलणे सुरू करत आहोत असे होता कामा नये, समोरील व्यक्ती देखील तितकीच उत्सुक आहे का हे देखील यातून कळते.

संभाषणाचे काही अलिखित नियम
✳️ फक्त स्वतःला महत्त्व देऊ नका.
✳️ संभाषणात दोन्ही / सर्व व्यक्तींना मत मांडायचा हक्क आहे.
✳️ मीच योग्य आणि बाकी अयोग्य असा पवित्रा घेऊ नका.
✳️ तुमचे मत/ विचार कुणाला पटले नाही तर ते स्वीकारा, समोरच्याला दोष देऊ नका.
✳️ स्वतःच्या आणि समोरच्या व्यक्तीच्या भावना समजून घ्या.
✳️ समोरच्या व्यक्ती कडे बघून बोला. तुमचे श्वसन देखील काही वेळाने सोबत होऊ लागते.
✳️ नवीन ठिकाणी जाणार असाल तर वेळेआधी जा आणि योग्य टेबल निवडा, स्वतःला कंफर्टेबल करा.
✳️ सकारात्मक विचार सुरू ठेवा.

Need Help ? Talk to the expert now !

Counselling Psychologist
Scroll to Top