fbpx

Coping up with Sexual abuse

images (2).jpeg
Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on skype
Share on whatsapp
Share on email
Share on print

गेल्या महिनाभरात rape केसेस बद्दल बातम्या बघून आणि वाचून मन प्रचंड डिस्टर्ब झाले होते, पण जेव्हा शांत मनाने विचार केला तेव्हा असे जाणवले की rape सारखी मोठी घटना समोर आली की आपण खडबडून जागे होतो पण लैंगिक शोषण हा विषय आपल्याकडून अनेकदा दुर्लक्षित राहतो. साधारण 3 पैकी 1 स्त्री आणि 4 पैकी 1 पुरुष लहानपणी लैंगिक शोषणाचा बळी होतात आणि हा आकडा खूपच चिंताजनक आहे. यात वयाच्या 18 वर्षांपूर्वी लैंगिक शोषण होणाऱ्या लोकांची संख्या लक्षणीय आहे. स्टडीज नुसार सेक्शुअल अब्युज चे व्यक्तीच्या आयुष्यावर दूरगामी परिणाम होत असतात.

Sexual Abuse / लैंगिक शोषण यांचे व्यक्तीच्या आयुष्यावर होणारे परिमाण

मानसिक स्वास्थ्यावर होणारे परिणाम –
✳️डिप्रेशन
✳️Anxiety
✳️PTSD
✳️Borderline personality डिसऑर्डर
✳️ड्रग्स किंवा कोणतेही व्यसन लागणे
✳️ आत्महत्येचे विचार
✳️ Relationship मध्ये insecurity, ब्रेकअप, घटस्फोट चे विचार
✳️ शरीर संबंध प्रस्थापित करताना अडचणी येणे ( पुरुषांमध्ये Erectile dysfunction)
✳️ पुन्हा लैंगिक शोषणाचे भय

शारीरिक स्वास्थ्यावर होणारे परिणाम –
✳️ अनियंत्रित वजन वाढ, स्थूलपणा
✳️ क्रॉनिक पेन
✳️ जठरविषयक आजार
✳️ श्वसनाचे आजार

त्याचसोबत नोकरी किंवा व्यवसायात मन न लागणे, शिक्षणात लक्ष नसणे, एकूणच शांत बसणे आणि शून्यात बघत राहणे असे अनेक दुष्परिणाम होतात.

18 वर्षांच्या आतील मुलांमध्ये सेक्शुअल अब्युज चे प्रमाण जास्त आहे, पालक आणि मुलांचा संवाद जास्त नसेल तर मुले त्यांच्या सोबत झालेल्या घटना भीतीमुळे पालकांना सांगत नाहीत. अश्यावेळी खालील लक्षणे जर आपल्या मुलांमध्ये / भावंडांमध्ये दिसत असतील तर त्यांची आपुलकीने चौकशी करणे आपले कर्तव्य आहे असे समजावे.

✳️ व्यक्ती अतिशय शांत आणि एकटे राहणे पसंत करू लागला आहे.
✳️ काही कारण नसताना उगाच रडत आहे.
✳️ अचानक Bed wetting सुरू झाले आहे.
✳️ झोपेतून दचकून उठत आहे.
✳️ उगाचच आक्रमक होणे, विनाकारण चिडणे
✳️ डोके किंवा पोट दुखत आहे अशी तक्रार करणे पण त्याचे कारण न सापडणे.
✳️ अचानक खेळायला न जाणे किंवा काही नातेवाईक / मित्र यांना पाहून घाबरणे, त्यांना भेटणे टाळणे.
✳️ शाळेत जायची भीती वाटणे.
वागणुकीत असे काही असेल तर वेळ न घालवता प्रेमाने चौकशी करावी.

सेक्शुअल अब्युज होऊ नये म्हणून करायचे उपाय !

✳️ गूड टच आणि bad टच बद्दल लहान मुलांना सांगा.
✳️ आपली मुले/ भाऊ बहिण यांना विश्वासात घ्या आणि body secrets ठेवू नये असे समजवा.
✳️ योग्य वयात मुलांना सेक्स एज्युकेशन द्या.
✳️ Consent म्हणजे काय आणि त्याची गरज समजवा.
✳️ चुकीच्या गोष्टी सहन न करण्याची सवय लावा.
✳️ कुणासोबत असे काही झाले असेल तर त्याला सपोर्ट करायची सवय मुलांना लावा.
✳️ कोणतेही नाते बनवताना त्याचा उद्देश समजून घ्या.
✳️ कोणत्याही प्लॅटफॉर्म वर नग्न छायाचित्रे शेअर करू नका.
✳️ स्त्री पुरुष भेद करू नका.

एक पालक/ ताई / दादा किंवा नातेवाईक म्हणून घ्यायची काळजी

✳️ लहान मुले काय खेळतात याकडे लक्ष द्या.
✳️ कोणत्याही teen age मुलासोबत / मुलीसोबत लहान मुलांना एकटे सोडू नका.
✳️ छोट्या छोट्या गोष्टी लहान मुलांना सांगायचा प्रयत्न करा.
✳️ परिवारात किंवा ओळखीत कुणी नातेवाईक जर शोषण करणारे वाटत असतील तर त्यांपासून मुलांना लांब ठेवा.अशा लोकांना एक्सपोज करा माफ करू नका.
✳️ प्रेम, आकर्षण आणि शरीर संबंध यांची योग्य माहिती लहानांना द्या.

जे लोक याचा शिकार झाले आहेत अशा व्यक्तींना यातून बाहेर काढणे शक्य आहे, चांगली थेरपी, जवळचे मित्र आणि परिवाराचा सपोर्ट यांचा योग्य वापर करून व्यक्तीला यातून बाहेर काढले जाऊ शकते. घडलेल्या घटनेचा ट्रॉमा इफेक्ट कमी करून सामान्य जीवन जगण्यासाठी पुढील 5 स्टेप्स नक्कीच मदत करतील.

1️⃣ Psychotherapy – एका चांगल्या therapist करून टॉक थेरपी घेणे हे सर्वात मोठे पाऊल असते. लहान वयात किंवा teen age मध्ये सेक्शुअल abuse चा शिकार झालेल्या व्यक्तींवर Trauma based cognitive-behavioral therapy ( TF-CBT) चा सकारात्मक प्रभाव जाणवतो. CBT मुळे डिप्रेशन, स्ट्रेस आणि panic attack कमी होतात.

2️⃣ Mindfulness – या पद्धतीचा वापर करून देखील स्ट्रेस प्रचंड प्रमाणत कमी होतो, त्याचबरोबर PTSD आणि Anxiety देखील कमी होते, अगदी सहज मार्ग म्हणजे ध्यान आणि प्राणायाम देखील या अवस्थेशी लढायला मदत करतात.

3️⃣ Social Support – आपण एक सामाजिक प्राणी आहोत, कुठल्याही ट्रॉमा चा सामना करताना हेल्प / सपोर्ट ग्रुप , एक पाठबळ देणारा परिवार, जीवाभावाचे मित्र हे आपली संपत्ती असते. त्यांच्या सकारात्मक विचारांनी सफर करणाऱ्या व्यक्तीचे नकारात्मक विचार कमी होतात, त्यांना पाठबळ मिळते.

4️⃣ Self-Care – सेक्शुअल अब्युज मुळे व्यक्तीच्या खाण्यापिण्यावर, झोप घेण्यावर, लोकामध्ये मिसाळण्यावर खूप फरक पडतो, आपल्यासोबत असे काही झाले आहे या भावनेने आपली झोप आणि भूक गायब होते पण पुरेशी झोप आणि अन्न न घेतल्यास यातून बाहेर यायची प्रोसेस अजूनच कठीण होते आणि शारीरिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता असते, त्यामुळे स्वतःची काळजी घेणे खूप गरजेचे आहे.

5️⃣ अस्तित्व ओळखा – सेक्शुअल अब्युज झाल्यानंतर अनेकदा आपल्याला आपले पावित्र्य भंग झाल्या सारखे वाटते, आयुष्यात काहीच उरले नाही आणि या परिस्थिती साठी आपणच दोषी आहोत अस आपला समज होतो त्यामुळे मानसिक खाच्चिकरण होते, आपले अस्तित्व हे शरिरापेक्षा जास्त आहे आणि की घटना झाली त्यामुळे आपण अपवित्र झालो हा गैरसमज आहे हे स्वीकारून पुन्हा जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने बघणे सुरू कारणे आवश्यक असते.

Need Help ? Talk to the expert now !

Counselling Psychologist
Scroll to Top