fbpx

पश्र्चाताप किंवा regret सोबत कसे deal करावे ?

पश्र्चाताप किंवा regret म्हणजे आपण बदलू शकत नसलेल्या परिस्थिती/ गोष्टीवर खंत किंवा दुःख व्यक्त करणे, आपल्याला अनेकदा नव्याने तेच काम करायचे असते पण आपण सतत खंत व्यक्त करत भूतकाळात जगत असतो. कधी कधी तर ही खंत व्यक्तीला आयुष्यभर त्रास देत असते, त्यामुळे नाती बनवताना आणि निभावताना खूप त्रास होतो.

पश्र्चाताप किंवा regret चे दोन प्रकार आहेत.

✳️ अकृतिजन्य – आपण एखादा निर्णय योग्य वेळेत घेतला नाही म्हणून होणारे दुःख, उदा. कॉलेज चा अर्ज न भरणे किंवा नोकरी साठी interview न देणे इत्यादी.

✳️ कृतिजन्य – एखादा निर्णय चुकीचा घेतला म्हणून वाटणारी खंत, उदा. दारू पिऊन गाडी चालवणे, कुणाला तरी फसवणे इत्यादी.

एका नर्स ने आपल्या काही पेशंट चे end of the life regret नोटीस केले होते, आपले आयुष्य आता संपणार आहे हे माहीत असताना त्यांच्या मनात असणारी खंत कोणती हे जाणून घेण्याचा तिचा मानस होता. त्यातील काही कॉमन regrets पुढील प्रमाणे.

✳️ कदाचित मी स्वतःला हवे तसे जगलो असतो, उगाच दुसऱ्यांना आवडेल तसे आयुष्य जगत बसलो.
✳️ मी उगाच आयुष्य फक्त कामात घालवलं.
✳️ मी माझ्या भावना योग्य ठिकाणी का नाही व्यक्त केल्या.
✳️ मी माझ्या मित्रांच्या संगतीत राहिलो असतो तर किती बरे झाले असते.
✳️ मी स्वतःवर उगाच बंधन लादून घेतली.

माझ्याकडे साधारण 2 वर्षांपूर्वी एक व्यक्ती counseling साठी आली होती, त्यांच्या पतीचे 4 महिन्यांपूर्वी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले होते, त्यांना 2 मुले आहेत. त्यांनी बोलताना मला सहज सांगितले की मी माझ्या आयुष्याची 9 वर्षे एका अती रागीट व्यक्तीला समजून घेण्यात उगाच बरबाद केली, जो प्रत्येक गोष्टी साठी मलाच दोषी समजायचा. मला एक चांगली आई आणि बायको व्हायचे होते पण प्रत्येक वेळी हा मध्ये येऊन सर्व खराब करायचा मी उगाच लग्न केले आणि ते निभावत बसले.

वरील किस्स्यातून तुम्हाला एक अंदाज आला असेल की regret चे मूळ हे आपला basic स्वभाव आणि आपण आपल्यावर बंधन लादून समाजाला दाखवण्यासाठी बनवलेला स्वभाव यांच्यातील तफावतीत आहे.

वरील प्रसंगाबद्दल बोलायचं झाले तर त्या स्त्री चे शिक्षण खूप छान झाले होते, लग्नाच्या वेळी पण तिने लग्नानंतर काम करायची इच्छा व्यक्त केली होती पण लग्न झाले आणि पहिल्याच वर्षी ती गरोदर राहिली आणि मग घरच्यांची आणि मुख्यत्वे नवऱ्याची इच्छा म्हणून तिने नोकरी करायचो इच्छा सोडून बाकीच्यांना please / खुश करायला बाळाला जन्म दिला आणि मग आता त्या निर्णयावर तिला भयंकर पश्र्चाताप होत आहे.

आपल्या स्वतःचे आयुष्य दुसऱ्याच्या ताब्यात देऊन फक्त त्यांना किंवा समाजाला बरे वाटेल म्हणून जे निर्णय घेतले जातात त्यामुळे पुढे जाऊन anxiety, निद्रानाश आणि डिप्रेशन असे अनेक मानसिक विकार देखील जन्म घेतात. आपले आयुष्य किती दुःखद आहे असा विचार सतत येऊन आपली सेल्फ esteem देखील कमकुवत होते.

पण आयुष्यात सर्वच निर्णय योग्य नसतात आणि आपण पाठी जाऊन ते बदलू तर शकत नाही मग अश्या वेळी आपल्याला वाटणारी खंत कशी दूर करावी ?

स्वतःला heal करण्याचे काही सोपे मार्ग आहेत, त्यासाठी सर्वात आधी मनाची तयारी हवी.

✳️ स्वतःशी मैत्री करा – स्वतःबद्दल अजिबात judgemental होऊ नका, स्वतःला समजून घ्यायचा प्रयत्न करा आणि स्वतःला पण दया दाखवा. स्वतःवर प्रेम करायला सुरुवात करा. तुमच्या आयुष्यात होणारी प्रत्येक गोष्ट ही तुमच्या हातात नसते त्यामुळे उगाच सगळ्यासाठी स्वतःला दोष देणे बंद करा.

✳️ स्वीकार – माझ्या सेल्फ हेल्प संदर्भातील सर्व लेखात मी सांगतो की आपण आपल्या सोबत होणाऱ्या गोष्टींचा/ घटनांचा स्वीकार केला पाहिजे, अमुक एक घटना माझ्यासोबत का झाली ? मीच का ? असे प्रश्न न विचारता ती घटना झाली आहे असे स्वीकारून त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधावा. स्वीकार हा आपल्याला anxiety आणि स्ट्रेस पासून आपल्याला लांब ठेवतो.

✳️ आनंदाचे क्षण आठवा – आपल्या आयुष्यात फक्त दुःखद घटनाच घडत नसतात, अनेक क्षण किंवा छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला आनंद देणारा असतात. जेव्हा कधी आयुष्यात सर्व काही वाईट झाले आहे आणि आपणच दोषी आहोत असे वाटू लागेल तेव्हा चांगले क्षण आठवा म्हणजे आपोआप दुःख कमी होते.

✳️ तुलना करा – आपण नेहमी आपल्यापेक्षा सुखी लोकांशी आपली तुलना करत असतो त्यामुळे आपल्याला अजूनच दुःखी आणि वाईट वाटते या उलट आपल्या पेक्षा दुःखात असणारे लोक आहेत त्यांच्याशी एकदा तुलना करून पहा. उदा. आपण कॉलेज चा फॉर्म भरला नाही म्हणून एक वर्ष वाया गेले पण मित्राने तीच संधी घेतली आणि आज तो जास्त जमवतो असे जेव्हा वाटेल तेव्हा विचार करा की काही लोक आहेत ज्यांना फॉर्म साठी पैसे गोळा करणे देखील कठीण जाते. असा विचार केल्यास दुःख पचवणे सोपे जाते.

✳️ अर्थपूर्ण goals सेट करा – पश्र्चाताप होऊ नये म्हणून केव्हाही अर्थपूर्ण आणि मेजरेबल गोल सेट करावेत, जे आपल्याला शक्य असतील आणि त्यांना रिॲलिटी चा देखील दुजोरा असेल. म्हणजे ते मिळवणे सोपे जाते. उगाच मोठे आणि अशक्य ध्येय ठेवले आणि ते पूर्ण झाले नाही तर वाटणारी खंत प्रचंड त्रास देऊ शकते.

जेव्हा आपण स्वतःचे मित्र बनतो, घटना आहेत तशा स्वीकारतो, आपले आनंदाचे दिवस आठवतो, आपल्या पेक्षा कमी आनंदी लोकांशी तुलना करतो आणि योग्य प्रकारे गोल सेट करतो तेव्हा आपला दृष्टिकोन बदलतो आणि मग आपल्या भावना देखील सहज बदलतात. पश्र्चाताप किंवा regret कमी होऊन आपण सहज जीवन जगू लागतो.

Need Help ? Talk to the expert now !

Counselling Psychologist
Scroll to Top