fbpx

थेरपीचे पहिले सेशन कसे असते ?

योग्य थेरपिस्ट निवडला की मग पुढे काय करावे ? थेरपी सेशन कसे असतात याविषयी लोकांना खूपच कुतूहल असते. आपण सकारात्मक विचाराने थेरपी घेणार असलो तरीही पहिल्यांदा थेरपिस्ट सोबत बोलताना आपल्याला चिंता वाटू शकते, पेशंट आणि थेरपिस्ट यांची एकमेकांशी ओळख व्हावी आणि थेरपीचा उद्देश निश्चित व्हावा यासाठी पहिले सेशन महत्वाचे असते. आजच्या लेखात आपण पहिल्या सेशन बद्दल माहिती घेऊ.

मला थेरपी सुरू करताना नर्व्हस फील होत आहे, हे नॉर्मल आहे का ?

हो, थेरपी सुरू करण्याचा निर्णय हा खूप कमी वेळा मोकळ्या मनाने घेतला जातो, आपल्या मनातील विचार एखाद्या अनोळखी व्यक्तीला सांगायचे आहेत या विचाराने आपल्याला भीती, चिंता आणि समोरच्या बद्दल संशय वाटू शकतो. पण या सर्व भावना आपण आपल्या थेरपिस्ट ला न घाबरता सांगू शकतो. मुळात या परिस्थिती ला pre session anxiety असे म्हणतात. जर अशी anxiety 3-4 सेशन नंतर सुद्धा वाटत असेल तर ती एक समस्या असू शकते अशा वेळी थेरपिस्टला ते नक्की सांगावे.

थेरपी चे पहिले सेशन मोफत असते का ?

शक्यतो फोन वर केलेले पाहिले consultation हे मोफत असते, काही थेरपिस्ट पाहिले ऑफलाईन introduction सेशन देखील मोफत देतात. जसे मी मागील लेखात सांगितले की योग्य थेरपिस्ट निवडणे हे कठीण काम आहे त्यामुळे फ्री trial घेतल्यास थेरपिस्ट योग्य आहे की नाही हा अंदाज येतो. पण बरेच लोक फक्त पाहिले सेशन मोफत घेतात आणि नंतर थेरपी घेत नाहीत त्यामुळे अनेकांनी मोफत सेशन देणे बंद केले आहे.

पहिल्या सेशन साठी काय तयारी करावी ?

सर्वात आधी आपल्याला काय समस्या आहेत ते आपण नीट लिहून काढावे/ नोट्स बनवावे. त्या संदर्भात असलेल्या भावना/ भूतकाळातील किस्से जे थेरपिस्ट ला माहीत असणे आवश्यक आहे ते सर्व आठवून ठेवावे. तुम्ही कधीच न गेलेल्या ठिकाणी पहिल्यांदा जाणार असाल तर 15 मिनिटे आधी जावे म्हणजे वातावरणाशी जुळवून घेता येते.

मी थेरपी साठी कुणाला सोबत नेऊ शकतो का ?

तुम्ही तुमच्या परिवारातील किंवा प्रिय व्यक्तीला मोरल सपोर्ट साठी सोबत घेऊन जाऊ शकता, पण त्यांना waiting room पर्यंतच सोबत राहता येते. जेव्हा बोलायची वेळ येते तेव्हा पेशंट आणि थेरपिस्ट हे दोघेच बोलतात. फॅमिली आणि कपल थेरपी मध्ये एक पेक्षा जास्त लोक सोबत असू शकतात. थेरपी ही पेशंट आणि थेरपिस्ट मधील वैयक्तिक आणि गोपनीय गोष्ट असते त्यामुळे शक्यतो तिसऱ्या व्यक्तीला किंवा थेरपी चा भाग नसलेल्या व्यक्तीला प्रवेश दिला जात नाही.

मला पहिल्या सत्रात काय काय विचारले जाऊ शकते ?

पहिले सत्र हे शक्यतो ओळख आणि समस्या समजून घेण्यासाठी असते, तुम्ही थेरपी साठी का आलात ? तुमची ओळख आणि जीवनाकडे बघण्याच्या दृष्टिकोन असे प्रश्न विचारले जातात. कोणत्या प्रोब्लेम मुळे तुम्ही थेरपी घेण्यासाठी तयार झालात, या थेरपी कडून तुमच्या काय अपेक्षा आहेत, तुमचे आता पर्यंतचे आयुष्य कसे होते, आधी कधी थेरपी घेतली होती का असे प्रश्न विचारले जातात. त्याचबरोबर थेरपिस्ट त्याचे व्ह्यू आणि थेरपी पॅटन समजावून सांगतात. तुम्ही दिलेली माहिती summarize करून तुमच्या समोर मांडतात.

माझी फॅमिली हिस्टरी विचारली जाऊ शकते का ?

हे आजारावर अवलंबून असते, बरेच मानसिक आजार हे जेनेटिक असतात, त्यामुळे परिवारात कुणाला मानसिक आजार होते का हे समजून घेणे गरजेचे असते. त्यामुळे परिवाराची मेंटल हेल्थ हिस्टरी घेतली जाऊ शकते. काही थेरपिस्ट ही माहिती पहिल्या सत्रात घेतात तर काही दुसऱ्या सत्रात. हिस्ट्री घेण्याचा निर्णय थेरपिस्ट यांवर अवलंबून असतो.

थेरपिस्ट माझ्यासाठी योग्य आहे हे कसे ओळखावे ?

थेरपिस्ट ची पात्रता ठरवण्यासाठी कोणतेही प्रणाम अस्तित्वात नाही, प्रत्येक क्लाएंट ला वेगवेगळे अनुभव आलेले असतात. ज्या थेरपिस्ट सोबत आपल्याला कंफर्टेबल वाटते तो थेरपिस्ट आपल्यासाठी योग्य असतो. थेरपिस्ट आपले सर्व ऐकून घेत आहे, थेरपिस्ट ने पूर्वी आपल्या सारखे लोक ट्रीट केले आहेत आणि थेरपिस्ट सकारात्मक विचार करणारा आहे हे तिन्ही निकष पूर्ण होत असतील तर तो थेरपिस्ट योग्य आहे समजावे.

मला थेरपिस्ट समोर रडू आले तर ?

थेरपिस्ट समोर रडणे अगदी सामान्य आहे, थेरपिस्ट जातील भावना हाताळण्यासाठी आणि जटील समस्या सोडवण्यासाठी प्रशिक्षित असतात आणि अजिबात जजमेंटल नसतात त्यामुळे त्यांच्या समोर भावना मांडताना कोणताही संकोच करू नये. तिथे आपण आपल्या भावना दाबून ठेवल्या तर त्याचा त्रास जास्त होऊ शकतो आणि समस्या सुटणे जटील होत जाते.

थेरपी सेशन संपवून बाहेर आल्यावर कसे वाटायला हवे ?

जेव्हा पाहिले सेशन संपवून तुम्ही बाहेर याल तेव्हा तुम्हाला किमान एक विश्वसनीय मित्र मिळाला आहे असे वाटायला हवे, तुम्हाला त्यांना पुन्हा भेटायची इच्छा व्हायला हवी. मन मोकळे झाले आहे अशी भावना असायला हवी आणि सकारात्मक विचार मनात यायला हवे.

थेरपिस्ट चे सोशल मीडिया आणि अन्य अकाउंट फॉलो करायला हवे का ?

थेरपी सुरू असताना शक्यतो थेरपिस्ट चे पर्सनल अकाउंट आणि सोशल मीडिया यांपासून लांब राहणे योग्य असते. अनेकदा आपण त्यांना judge करतो ते होऊ नये म्हणून आपण त्यांना स्टॉक करू नये. नाते प्रोफेशनल ठेवायचा प्रयत्न करावा. अनेकदा आपण थेरपिस्ट च्याच प्रेमात पडतो/ आकर्षित होतो अश्यावेळी त्याला रेड फ्लॅग समजून तिथेच भावनांना आवर घालावा.

थेरपी चे पहिले सत्र हे अगदी सामान्य असते, त्या आधी थोडे नर्व्हस असणे अगदी सामान्य आहे, पण हे पहिले पाऊल तुम्हाला समस्येतून मुक्त करेल हा विश्वास ठेवल्यास त्यातून सकारात्मक रिझल्ट लवकर मिळू लागतात.

Need Help ? Talk to the expert now !

Counselling Psychologist
Scroll to Top