fbpx
images (1).jpeg
Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on skype
Share on whatsapp
Share on email
Share on print

Covid महामारीच्या काळात अनेकांनी आपल्या प्रियजनांना गमावले, आपल्या डोळ्यादेखत आपली प्रिय व्यक्ती दूर होणे यासारखे मोठे दुःख जगात कोणतेच नसते. ते दुःख पचवणे आपल्यासाठी खूपच कठीण असते. काय करावे आणि कसे वागावे हे अजिबात सुचत नाही. बरेचदा आपण guilt मध्ये जातो, झालेल्या प्रकारासाठी स्वतला दोष देतो आणि सतत कन्फ्युज असतो. आपण एखाद्यावर जितके अधिक प्रेम करतो, त्यांच्या जितके क्लोज असतो तितकी दुःखाची भावना तीव्र असते, आणि त्यातून बाहेर येणे देखील गुंतागुंतीचे असते.

दुःख किंवा शोक हे स्वतःचा मार्ग वापरतात त्यामुळे दुःखात आपल्या भावना कोणतेही ठराविक वेळापत्रक पाळत नाहीत किंवा त्या भावना टाळायचा कोणताही मार्ग अस्तित्वात नसतो. जर कुणी आपल्या भावना दाबून ठेवत (suppress) असेल किंवा एखादी व्यक्ती आपल्याला सोडून गेली आहे हे स्वीकारत नसेल (deny) तर शोकातून बाहेर यायची प्रोसेस अजून कठीण होत जाते. Suppression आणि denial मुळे व्यक्तीला अधिकाधिक मानसिक आधाराची आवश्यकता भासते.

शोक किंवा दुःख किती काळ राहील हे व्यक्ती नुसार बदलत असते, काही व्यक्ती कमी कालावधी साठी दुःखाचा अनुभव घेतात आणि लवकर नॉर्मल होतात (acute grief) पण त्यांना नंतर कधीही अनपेक्षितरित्या हेच दुःख त्रास देऊ शकते. प्रिय व्यक्तीचा वाढदिवस किंवा त्यांच्याशी संबंधित काही घटना समोर आल्या की पुन्हा काही काळासाठी उदास वाटू शकते. पण काही लोकांमध्ये हे दुःख जास्त कालावधी पर्यंत राहते ( complicated grief) याचा कालावधी काही महिने ते वर्ष असाही असू शकतो, योग्य support आणि मार्गदर्शन न मिळाल्यास हेच दुःख सामाजिक विलगिकरण (isolation) आणि क्रॉनिक lonliness मध्ये रुपांतरीत होते.

मानसशास्त्राने या दुःखाच्या 5 पायऱ्या सांगितल्या आहेत,
1️⃣ Denial – अस्विकार , हे सर्व माझ्यासोबत होऊच शकत नाही.
2️⃣ Anger – राग किंवा द्वेष, हे माझ्यासोबत का होत आहे ? मी कुणाचं वाईट केलं आहे ? परिस्थिती किंवा स्वतःला, इतरांना दोष देणे.
3️⃣ Bargaining – सौदेबाजी , हे सर्व पुन्हा होते तसे चांगले करा, त्याच्या बदल्यात मी हे करेन. शक्यतो बळी किंवा मृत व्यक्तीला पुन्हा जिवंत करण्यासाठी जादूटोणा या अवस्थेत करतात लोक.
4️⃣ Depression – नैराश्य, मी काहीच करू शकत नाही.
5️⃣ Acceptance – स्वीकार, जे झालं ते होणार होत, मी माझ्या परीने सर्व प्रयत्न केले आणि मी जे झाले आहे ते स्वीकारले आहे.

निरिक्षणातून असे समोर आले की काही व्यक्ती या पायऱ्यांचा अनुभव घेत नाहीत तर काही लोक या पायऱ्या क्रमाने पूर्ण करतात आणि शेवटी Acceptance म्हणजे स्वीकार या पायरीवर येऊन सामान्य आयुष्य जगू लागतात. एकूणच दुःख किंवा शोक ही वैयक्तिक आणि अंदाज बांधता न येणारी अवस्था आहे. त्यामुळे व्यक्ती नुसार त्याशी सामना करायची पद्घत वेगळी असू शकते.

अनेकदा शोक आणि डिप्रेशन यांमध्ये लोकांची गल्लत होते, कारण दोन्ही अवस्थेत दुःख, आनंदाचा अभाव, निद्रानाश, खाण्यात रस नसणे असे सारखेच symptoms असतात, पण शोक हा कालांतराने कमी होत जातो आणि परिस्थितीनुसार तो पुन्हा डोके वर काढतो जसे मृत व्यक्तीचा जन्मदिवस किंवा लग्नाचा वाढदिवस इत्यादी. पण डिप्रेशन ही अवस्था जास्त काल टिकणारी असते.

जवळची व्यक्ती निधन पावल्यानंतर आपल्याला दुःख होणे स्वाभाविक असते, पण शोक किंवा दुःख हे कुणाच्यातरी मृत्यू मुळेच होईल असे आवश्यक नाही. आपण खूप जीव लावत असलेले पाळीव प्राणी यांचा मृत्यू, घटस्फोट, ब्रेकअप, एखादी चांगली नोकरी गेल्याचे दुःख, घर किंवा आपल्यासाठी मौल्यवान असणारी वस्तू दूर जाणे किंवा हरवणे अशा परिस्थिती देखील तीव्र दुःख देऊ शकतात.

ग्रिफ चे वर्गीकरण साधारण 3 प्रकारात केले जाते.

✳️ Anticipatory grief – एखादी घटना घडण्या आधीच तिच्याबद्दल विचार करून आपण जे दुःख अनुभवतो त्याला Anticipatory grief म्हणतात, उदा. आपल्या पाळीव प्राण्याचे वय झाले आहे आणि तो आता कोणत्याही दिवशी निधन पावेल ही भीती किंवा आता रिटायरमेंट चे वय झाले आहे ही भीती. या भीती चा एक फायदा म्हणजे आपले नुकसान होणार आहे हे माहीत असते त्यामुळे आपण अव्यक्त भावना बोलून दाखवतो किंवा कर्तव्य पूर्ण करू शकतो.

✳️Disenfranchised grief – आपले नुकसान अतिशय छोटे आहे असा जेव्हा आपला समज होतो तेव्हा त्याला Disenfranchised ग्रिफ म्हणतात. जसे नोकरी जाणे किंवा मैत्री तुटणे, जगाच्या दृष्टीने वर वर या घटना छोट्या असतात त्यामुळे आपण यांची चर्चा कारणे टाळतो.

✳️ Complicated grief – दुःख जेव्हा वेळेसोबत कमी होत नाही, उलट त्याचा परिणाम रोजच्या आयुष्यावर होऊ लागतो तेव्हा त्याला Complicated grief म्हणतात. यातून बाहेर पडण्यासाठी शक्यतो प्रोफेशनल हेल्प घ्यावी लागते.

काही कॉमन Myth / गैरसमज
आपल्याकडे असलेला गैरसमज या प्रोसेस ला अजून कठीण करतो, उदा. जितके जास्त दुःख तितके त्या व्यक्ती वर प्रेम. उदा. पती चा मृत्यू झाल्यानंतर पत्नी ने आजन्म दुःखीच राहावे जर ती थोडे खुश दिसू लागली तर लोक लगेच judge करतात की तिचे प्रेम कमी होते.

❌तुम्ही दुःखाला इग्नोर केले तर ते लवकर नाहीसे होते.
✔️असे केल्याने यातून बाहेर पदयलसाजून वेळ लागू शकतो, दुःख स्वीकारणे जास्त गरजेचे आहे .

❌Strong राहणे हाच दुःखावर पर्याय आहे.
✔️अजिबात नाही, दुःखात उदास वाटणे साहजिक आहे आणि रडू येणे हे कमजोरी चे लक्षण अजिबात नाही. नेहमी आपल्या भावना एक्स्प्रेस करणे योग्य असते.

❌जर तुम्ही रडला नाहीत तर तुम्हाला दुःख झाले नाही.
✔️रडणे म्हणजे दुःखी असणे असे नाही, प्रत्येकाची दुःख व्यक्त करायची पद्धत वेगळी असते.

❌दुःख किंवा शोक किमान वर्षभर असावा.
✔️अशी कोणतीही सक्ती नाही.

❌Move on करणे म्हणजे झालेला लॉस विसरणे.
✔️Move on करणे म्हणजे लॉस स्वीकारून पुढे जाणे असते, किंबहुना हाच आयुष्याचा नियम असतो.

लक्षणे –

मानसिक –
✳️ तीव्र झटका आणि अविश्वास – व्यक्ती नास्तिक होते.
✳️ सतत उदास राहणे, सतत चिडचिड आणि राग येणे .
✳️ अपराधाची भावना – मी योग्य वेळी तिथे नव्हतो किंवा मला लक्षात का आले नाही हा विचार करून स्वताला अपराधी समजणे.
✳️ भीती – आपले लोक आपल्याला सोडून जात आहेत आणि आपण एकटे होणार ही भीती.

शारीरिक –
✳️ थकवा जाणवणे
✳️ मळमळ होणे
✳️ वजन कमी होणे किंवा वाढणे ( महिलांमध्ये थायरॉईड चे असंतुलन)
✳️ निद्रानाश
✳️ रोगप्रतिकारशक्ती कमी होणे.

दुःखातून बाहेर कसे यावे ?

प्रत्येक व्यक्ती वेगळी असल्याने यातून बाहेर पडायचे मार्ग देखील व्यक्तीनुसार बदलतात. पण पुढील टिप्स सर्वांसाठी उपयुक्त ठरतील अशी आशा करतो.
✳️ आपले दुःख स्वीकारा.
✳️ जे आपल्यासोबत होत आहे ते योग्य की अयोग्य हा विचार करू नका.
✳️ हे दुःख तुमच्या वाटेला आले आहे आणि यातून तुम्हाला बाहेर यायचे आहे हा निर्धार करा.
✳️ तुमच्या जवळच्या व्यक्ती कडून निःसंकोचपणे आधार घ्या.
✳️ स्वतःची काळजी घ्या, शारीरिक आणि मानसिक स्वास्थ चांगले ठेवा.
✳️ डिप्रेशन आणि ग्रिफ मधील फरक समजून घ्या.
✳️ Meditation किंवा सेल्फ hypnosis करा.

शोकाकुल व्यक्तीला आधार कसा द्यावा ?

आपली परिचित व्यक्ती दुःखी आहे हे आपल्याला पटत नसते, त्यासाठी काय करावे हा विचार नेहमीच आपल्या डोक्यात असतो. अश्यावेळी आपली भूमिका काय असावी हे लक्षात घेऊ.

✳️ दुःखाचे प्रकटीकरण हे विविध मार्गाने होत असते त्यामुळे सपोर्ट करणाऱ्याने दुःखात असलेल्या व्यक्तीच्या कलाने जावे, त्याला कसली गरज आहे हे समजून घ्यावे.
✳️ दुःखात असलेल्या व्यक्तीला चुकूनही judge करू नये, त्याला वाईट वाटेल असे वागू नये.
✳️ दुःखी व्यक्तीला त्यांची बाजू ऐकून घेणारे कुणीतरी हवे असते, त्यामुळे एक चांगला श्रोता बनून त्यांचे बोलणे समजून घ्यावे.
✳️ व्यक्ती स्वतःला दोष देत असेल तर त्याला त्यांनी केलेल्या चांगल्या गोष्टींची जाणीव करून द्यावी आणि त्याचा दोष कसा नव्हता हे सांगावे.
✳️ दुःखी व्यक्तीला मित्रांमध्ये किंवा बाहेर मिसळण्याची संधी द्यावी पण त्याची इच्छा नसल्यास जास्त फोर्स करू नये.
✳️ व्यक्तीला थोडा पर्सनल स्पेस / स्वतःसाठी राखीव वेळ देखील द्यावा.

Need Help ? Talk to the expert now !

Counselling Psychologist
Scroll to Top