fbpx

Leadership – प्रश्नोत्तरे

नेतृत्व कौशल्य किंवा leadership बद्दल आपल्याकडे अनेक समज आहेत. दूरदृष्टीला सत्यात आणण्याची क्षमता उत्तम leader मध्ये असते. सर्व अनुयायी किंवा कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवणे, त्यांना योग्य दिशा दाखवणे आणि सर्वांशी सकारात्मक communication ठेवणे ही त्यांची वैशिष्ठ्ये असतात. आजच्या लेखात नेतृत्व कौशल्याबद्दल मला आलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे आजच्या लेखात मी देण्याचा प्रयत्न केला आहे.

प्रश्न 1 – नेतृत्व कौशल्य जन्मजात असते का ?

रिसर्च नुसार एकूण कौशल्याच्या 1/3 म्हणजे 33% कौशल्य हे व्यक्ती जन्मजात घेऊन येते तर 2/3 म्हणजे उर्वरित 66-67% कौशल्य हे नंतर विकसित करता येते. extraversion म्हणजेच बहिर्मुख असणे, assertiveness म्हणजेच दृढनिश्चय आणि empathy म्हणजेच सहानुभूती ही जन्मजात कौशल्ये leadership साठी अती महत्वाची आहेत पण सोबतच शिक्षण, स्वविकास आणि अनुभव देखील व्यक्तिमत्व विकासाचे महत्वाचे घटक आहेत.

प्रश्न 2 – चांगले leader दुसऱ्यांना प्रोत्साहन कसे देतात ?

Leaders हे कधीच सर्व कामे स्वतःहून करत नाहीत. ते आपल्या सर्व सहकारी मित्रांना सोबत घेऊन कामे करून घेतात. त्याच बरोबर सर्वांची पाठ थोपटतात, योग्य वातावरण निर्मिती करून देतात. त्याच मुळे जिथे असे चांगले leaders असतात तिथले वातावरण खूपच छान असते आणि productivity देखील जास्त असते.

प्रश्न 3 – NARCISSISTIC लोक हे उत्तम लीडर होऊ शकतात का ?

Leader म्हणून काम करताना narcissist लोक हे सर्वांना भुरळून टाकतात. त्यांचा प्रभाव खूप खोलवर पडतो. एखाद्या कार्यक्रमात सर्वांचे लक्ष वेधून घेण्याची त्यांची क्षमता असते पण त्यांना दुसऱ्यांना क्रेडिट देणे जड जाते. कुणी critisize केले तर ते व्यवस्थित हांडके न करणे, सतत lime लाईट मध्ये राहणे आणि सहानुभूती ची कमतरता यामुळे ते चांगले leader सिद्ध होत नाहीत. वर वर त्यांचे काम समाधानकारक वाटत असले तरीही ते सहकारी वर्गात तितके प्रिय नसतात.

प्रश्न 4 – लीडर नेहमीच योग्य असतात का ? ते कोणत्या चुका करतात ?

जगात कोणीही पूर्ण वेळ योग्य नसते, अनेकदा leader देखील चुका करतात. आपल्याला leader केले आहे म्हणून कधी कधी अभिमान वाढतो आणि तो इगो मध्ये रुपांतरीत होऊ लागतो. माझेच बरोबर आहे हा गैरसमज होतो त्यामुळे चुकीची रिस्क घेतली जाते आणि नुकसान होते. लिडर म्हणून निवड झाली की जमिनीवर पाय ठेवून सर्वांना समजून घेणे, लोकांचे सल्ले घेणे आणि पूर्ण विचार करणे हे गुण विकसित केले की चुका होण्याची शक्यता कमी असते.

प्रश्न 5 – नोकरी मध्ये प्रमोशन झाले की चांगले लीडर कसे बनावे ?

अनेकदा आपला कलिग promote होऊन बॉस झाला आहे हा विचार आपल्याला पटत नाही. हीच वेळ आपल्यावर आली की आपण देखील गोंधळून जातो. काम आणि मैत्री सोबत कशी सांभाळावी हे सहज समजून येत नाही. त्यामुळे काम आणि मैत्री वेगळे ठेवणे आणि सर्वांना एक चांगले वातावरण उपलब्ध करून देणे हे साधे उपाय आपल्याला या कन्फुशन मधून बाहेर काढतात.

या विषयी तुमचे देखील कशी प्रश्न असतील तर ते शेअर करा. त्यांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला जाईल.

Need Help ? Talk to the expert now !

Counselling Psychologist
Scroll to Top