fbpx

Learning method

प्रत्येक व्यक्तीची learning method वेगळी असते, आणि आपल्या learning style नुसार अभ्यास केल्यास तो कमी वेळात आणि चांगल्या प्रकारे समजतो. अनेक शास्त्रज्ञ आणि संशोधकांनी वेगवेगळ्या पद्धती मांडल्या असून माझ्यामते नील फ्लेमिंग यांची VARK- module ही आदर्श पद्धत आहे. याच module वर मी गेले 6 वर्ष काम करत आहे. या बद्दल आज आपण अधिक माहिती घेऊ.

नील गलमिंग यांनी 1987 मध्ये विद्यार्थ्यांना मदत करायच्या उद्दत हेतूने VARK learning method ची आखणी केली, या module नुसार प्रत्येक व्यक्तीच्या Learning Preference नुसार त्याची Learning method ठरत असते.

Learning preference समजून घेणे का गरजेचे आहे ?

आपला Learning preference समजून त्या प्रमाणे अभ्यास केल्यास कमी वेळेत आणि तणावमुक्त अभ्यास करता येतो तसेच ती माहिती लक्षात ठेवणे सोपे जाते त्याचबरोबर self confidence, self image आणि self esteem वाढण्यास मदत होते, आपली कौशल्ये योग्य ठिकाणी कशी वापरावीत ते समजते.

Learning methods आणि त्यांची वैशिष्ट्ये.

✳️Visual learning –

वैशिष्ट्ये –
❤️ चित्र किंवा आलेख सहज समजतात.
❤️ कोणतीही गोष्ट पहिली की सहज समजते.
❤️ पाहिलेल्या गोष्टींचे नोट्स बनवणे सोपे जाते.
❤️ कंटाळा आला की आजूबाजूला बघणे पसंत करतात.
❤️ तोंडी सूचना पटकन कळत नाहीत.

Visual learning असणाऱ्या व्यक्तींनी अभ्यास करताना व्हिडिओ पाहणे किंवा संबंधित विषयाच्या आकृत्या, चित्र किंवा आलेख पाहणे सोयीचे ठरते, रूम मध्ये विषयाचे टाकते किंवा नोट्स लावणे, एखादी संकल्पना समजून घेताना ती मनात इमॅजिन करणे (visualisation) आणि त्यानुसार स्वतःचे नोट्स काढणे ही पद्धत वापरावी. वाचन करताना अधोरेखीत करायला वेगवेगळ्या रंगाचे कलर पेन/ हायलायटर वापरावे, जेणेकरून रंगावरून विषय सहज आठवतील.

या प्रकारातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देताना त्यांच्या डोळ्यासमोर दिसेल अशी भेटवस्तू द्यावी, किंवा एखादा फोटो, मोमेंटो असे गिफ्ट द्यावे.

✳️ Auditory Learning –

वैशिष्ट्ये –
❤️ ऐकलेल्या गोष्टी सहज लक्षात राहतात.
❤️ चर्चा करून सहज विषय कळतात.
❤️ गप्पा मारणे आणि ऐकणे प्रचंड आवडते.
❤️ यांना बोलायची खूप सवय असते.
❤️ चित्र किंवा आलेख सहज समजून येत नाहीत.
❤️ कोणत्याही आवाजाने सहज distract होतात.

Auditory learning असणाऱ्या व्यक्तींनी चर्चेवर भर देणे फायद्याचे असते, एखादा विषय ग्रुप सोबत चर्चा करून समजून घेतला तर तो सहज समजतो, जी उत्तरे कठीण वाटत असतील ती रेकॉर्ड करून पुन्हा ऐकणे, आपल्या मित्रांना तो विषय समजावून सांगणे, आपल्याला ऐकू येईल एवढ्या आवाजात पुन्हा बोलणे हे उपाय केल्यास सहज अभ्यास होऊ शकतो. शक्यतो अभ्यास करताना शांत जागा शोधावी.

या प्रकारातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देताना लोकांसमोर त्यांची स्तुती करणे, यांच्याबद्दल चांगले बोलणे असे उपाय करावे.


✳️ Reading & Writing Learning –

वैशिष्ट्ये –
❤️ सतत पुस्तक घेऊन अभ्यास करत असतात.
❤️ यांना वाचन करायची खूप आवड असते.
❤️ स्वतःचे नोट्स काढणे आणि स्वतःच्या भाषेत उत्तर देणे पसंत करतात.
❤️ समाजाच्या दृष्टीने आदर्श विद्यार्थी असतात.
❤️ एकटे राहणे पसंत करतात.

Reading & Writing Learning असणाऱ्या विद्यार्थ्यांनी वाचन करणे आणि स्वतःच्या भाषेत नोट्स काढणे सर्वोत्तम असते, सतत नवीन नवीन माहिती मिळवणे आणि अनेक संदर्भ शोधणे असे प्रयोग केल्यास विषयाची सखोल माहिती यांना मिळते. एकदा कॉन्सेप्ट कळली की मग ते आपल्या भाषेत लिहून काढल्यास ती जास्त चांगल्या प्रकारे समजते. कठीण विषयांचे भाषांतर केल्यास त्याचा अर्थ सहज समजून येतो.

या प्रकारातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देताना त्यांना संदर्भ पुस्तके किंवा dictionary, encyclopaedia असे भेट द्यावे, म्हणजे त्यांना आनंद होतो.

✳️Kinesthetic Learning –

वैशिष्ट्ये-
❤️ प्रात्यक्षिक करून गोष्टी सहज समजतात.
❤️ एका जागी बसणे कठीण जाते.
❤️ कोणतीही गोष्ट समजली की ती करून पाहण्याची इच्छा होते.
❤️ सतत हातापायांची हालचाल सुरू असते, चंचल असतात.
❤️ मोठे लेक्चर किंवा जास्त वेळ बसण्याचा कंटाळा करतात.

Kinesthetic Learning असणाऱ्या विद्यार्थ्यांनी अनुभवातून आणि उदाहरणातून शिकणे सोपे असते. गणिताचे प्रमेय/ theorem समजून घेताना त्याचे पुरावे आणि संकल्पना कळली की ती कुठे वापरायची हे समजणे सोपे जाते. अभ्यास करताना एका जागी बसणे कठीण जाते म्हणून फिरत अभ्यास केला तरी तो लक्षात राहू शकतो. थोड्या थोड्या वेळाने ब्रेक घेणे आणि अभ्यास करताना स्पंज बॉल किंवा फिजेट स्पिनर सोबत खेळणे असे काही केल्यास चंचलता कमी होऊ शकते.

या प्रकारातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देताना शाबासकी देणे, कौतुकाने डोक्यावर हात ठेवणे हे उपाय करावे. स्पर्शाने यांना समाधान मिळते.

सर्वच विद्यार्थी याच चार प्रकारात मोडतील असे नाही, काही विद्यार्थी वरील पैकी 2 method असलेले देखील असू शकतात. पण आपल्या learning स्टाईल नुसार अभ्यास केल्यास येणारा ताण कमी होतो आणि आपला वेळ देखील वाचतो.

हल्ली शिक्षण संस्थेत multimodal learning method वापरली जाते ज्यात वरील चारही प्रकारचे प्रेफरन्स वापरून शिकवले जाते, जेणेकरून सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांना विषय सहज आणि सोप्या पद्धतीने समजता येईल. यासाठी शाळा/ कॉलेज पुढील 4 मार्ग वापरतात.
✳️ शिक्षकांनी ओरली शिकवणे.
✳️ Audio visual माध्यमातून शिक्षण
✳️ लेखी किंवा छापील वर्कबुक / worksheet देणे.
✳️ काही प्रयोग / कलात्मक वस्तू बनवायला सांगणे.

आपल्याकडे हळू हळू multimodal learning प्रचलित होत आहे पण तरीही त्याचे पूर्ण प्रशिक्षण उपलब्ध नाही म्हणून आपण स्वतःची आणि मुलांची Learning method समजून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी अनेक questionnaire आधारित चाचण्या उपलब्ध आहेत तसेच अधिक योग्य रिझल्ट साठी आपण DMIT टेस्ट करू शकता.

Need Help ? Talk to the expert now !

Counselling Psychologist
Scroll to Top