fbpx

उजवा आणि डावा मेंदू – समज, गैरसमज

आपला मेंदू हा शरीरातील सर्वात गुंतागुंतीचा अवयव आहे, त्याचे वजन साधारण 1250 ते 1350 ग्रॅम असते. 86 अब्ज neurons आणि जवळपास 250 अब्ज न्युरल कनेक्शन असणारा हा अवयव विचार, कृती आणि भावना नियंत्रित करतो. आपला मेंदू 2 अर्ध गोलात विभागला गेला असून ते दोन्ही भाग वेगवेगळी कामे करतात. त्या अर्ध गोलांना आपण उजवा मेंदू आणि डावा मेंदू असे म्हणतो. आजच्या लेखात या दोन्ही अर्ध गोलांची माहिती आपण घेऊ.

आपल्या मेंदूचे दोन्ही भाग हे दिसायला अगदी सारखे असले तरीही त्यांची कामे आणि माहितीवर प्रक्रिया करायची पद्धत वेगवेगळी आहे, पण कामात फरक असून सुद्धा ते वैयक्तिकरीत्या कोणतेही काम पूर्ण करू शकत नाहीत. एकमेकांना पूरक काम करणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.

आपला मेंदू हा सर्वात लवचिक अवयव आहे, तो आजूबाजूची परिस्थिती आणि आपलं घेतलेले शिक्षण या प्रमाणे स्वतःला सतत reorganize करत असतो, याच बदलांचे निरीक्षण आणि अध्ययन करून वैज्ञानिकांनी अनेक सिद्धांत मांडले आहेत. त्यांचा वापर करून मेंदूचे आजार, अपघाती इजा इत्यादी वर उपचार करणे सोपे झाले आहे.

उजवा आणि डावा मेंदू थियरी

ही थियरी खूप सोपी आहे, व्यक्ती ही साधारण उजव्या किंवा डाव्या मेंदूने काम करणारी असते, म्हणजे तिच्या मेंदूची एक बाजू dominant असते. जर तुम्ही खूप जास्त लॉजिकल विचार करणारे असाल तर तुम्ही डाव्या मेंदूने विचार करणारे असता तर कला आणि क्रिएटिव्ह विचार करणारे असाल तर उजव्या मेंदूने विचार करणारे असतात.

1960 साली ही थियरी पहिल्यांदा जगासमोर मांडण्यात आली, psychobiologist आणि नोबेल पुरस्कार विजेते डॉक्टर रॉजर स्पेरी यांच्या रिसर्च नुसार मेंदूचे दोन्ही भाग वेगळ्या प्रकारे काम करतात.

रॉजर स्पेरी यांच्या रिसर्च नुसार उजवा आणि डावा मेंदू यांची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत.

❤️ उजवा मेंदू –
✳️ Imagination
✳️ सर्वसमावेशक विचार
✳️ Intution
✳️ कला
✳️ दिवास्वप्न
✳️ चाल/ rythm
✳️ चेहऱ्यावरील हावभाव
✳️ कल्पना करणे

❤️ डावा मेंदू –
✳️ लॉजिक / तार्किक विचार
✳️ क्रमशः विचार करणे
✳️ गणितीय विचार
✳️ शब्दाचा वापर
✳️ तत्व आणि fact यांना वापर

उजव्या मेंदूला analog ब्रेन असेही म्हणतात कारण तो खूप क्रिएटिव्ह आणि अस्तव्यस्त असतो तर डावा मेंदू डिजिटल ब्रेन म्हणतात कारण तो लॉजिक, reasoning, calculations आणि भाषा यांवर फोकस करणारा असतो.

वरील थियरी प्रमाणे दोन्ही मेंदू वेगवेगळ्या प्रकारे काम करत असले तरीही त्यातील कोणता एक dominant असतो का ? या विषयावर neuroscientists च्या एका टीम ने 2 वर्ष अभ्यास केला, साधारण 1000 लोकांचे MRI अभ्यासून त्यांनी काही मते मांडली, त्यातील सर्वात महत्वाचे मत म्हणजे एक बाजू दुसऱ्या बाजूला dominate करत नाहीत आणि कोणत्याही बाजूचे कनेक्शन हे दुसऱ्या बाजूच्या तुलनेत छोटे नसतात.

दोन्ही अर्ध गोल हे नर्व फायबर ने जोडलेले असतात, याच फायबर्स ना माहितीचा हायवे देखील म्हणतात. या हायवे मध्ये जर काही अडचणी असतील तर फीट येणे किंवा अचानक कन्फ्युज होणे असे आजार जाणवू शकतात. दोन्ही भाग जरी वेगवेगळे काम करत असले तरीही एकमेकांना पूरक काम करत असतात. आपण नेहमीच दोन्ही मेंदू एकत्र वापरत असतो.

समजा तुम्ही कुणाशी बोलत आहात तर मग डावा म्हणजे लॉजिकल मेंदू हा समोरच्या व्यक्तीचे शब्द आणि भाषा प्रोसेस करतो तर उजवा म्हणजे क्रिएटिव्ह मेंदू हा त्या शब्दांचे अर्थ आणि भाषेचा टोन समजून घेतो. एखादे गणित सोडवताना डावा मेंदू गणिताची सूत्र आणि आकडेमोड करतो तर उजवा मेंदू तुलना आणि अंदाज बांधण्यात मदत करतो.

दोन्ही मेंदू जर सुयोग्य प्रकारे काम करत असतील तर कला आणि तर्क हे दोन्ही व्यवस्थित प्रमाणात मांडले जाऊ शकतात. जर त्यात तफावत असेल तर बरेचदा आपण करत असलेले काम व्यवस्थित होत नाही. उदा. समजा माझे inagination खूप छान आहे पण तर्क कमी आहे आणि मला एक चित्र काढायचे आहे. तर माझा उजवा मेंदू छान इमॅजिन करेल पण तर्क कमी पडल्याने त्या चित्रात असलेले घटक/ त्यांची जागा/ आकार चुकण्याची शक्यता असते.

सोबत एक चित्र दिले आहे ज्यात जे शब्द लिहिले आहेत ते न सांगता ते कोणत्या रंगाने लिहिले आहेत ते सांगायचे आहे. या छोट्या ब्रेन ट्विस्टर ने आपल्याला दोन्ही बाजू कशा कन्फ्युज होतात आणि मेंदूला योग्य वेळ आणि आज्ञा दिल्यास तो कसे योग्य प्रकारे काम करतो ते कळेल.

Say the color, not the name !

उजवा आणि डावा मेंदू जरी कोणतेही काम सोबत करत असले तरी व्यक्तीचे व्यक्तिमत्व, स्वभाव, learning स्टाईल, learning method, मल्टिपल quotient हे सर्व त्याच्या मेंदूच्या कौशल्यावर आणि क्षमतांवर अवलंबून आहेत त्यामुळे आपल्या strength समजून घेऊन weaknesses वर काम करणे खूपच आवश्यक आहे, मेंदू हा सतत स्वतःला reorganize करत असल्याने आपण प्रयत्न केल्यास आपल्यात सकारात्मक बदल होण्यास मदत होऊ शकते.

Need Help ? Talk to the expert now !

Counselling Psychologist
Scroll to Top