fbpx

Narcissistic रिस्पॉन्स बदलू शकतो का ?

images (2).jpeg
Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on skype
Share on whatsapp
Share on email
Share on print

जो स्वतःला खूप ग्रेट समजतो त्याची खरच बदलायची इच्छा असते का ? असा प्रश्न मनात येणे खूप स्वाभाविक आहे. ज्यांना अशा लोकांचा अनुभव आहे ते तर ठाम असतात की Narcissistic लोक कधीच आपल्या चुका स्वीकारत नाहीत, ते कसे थेरपी घेणार.

Narcissistic Personality असणारे लोक थेरपी साठी लवकर तयार होत नाहीत किंवा थेरपिस्ट समोर काही गोष्टी स्वीकारताना संकोच करतात. त्यांना ट्रिगर करणारे काही झाले की बरेचदा ते समुपदेशकांवर ओरडतात, हायपर होतात. पण हळूहळू ते जगासमोर स्वीकारू न शकलेल्या गोष्टी स्वीकारू लागतात जसे

 1. अती हायपर होऊन काही कृती करणे.
 2. ओव्हर react होणे, कंट्रोल कसा करावा हे न कळणे.
 3. त्यांच्या सतत बदलणाऱ्या मूड चा त्यांनाच कंटाळा येऊ लागणे.
 4. सतत कुणाकडून तरी validation ची अपेक्षा ठेवून ठेवून स्वतःचा आत्मविश्वास गमावणे.
 5. हळू हळू एकटेपणा फील करणे, मित्रांची संगत तुटणे / relationship मध्ये प्रॉब्लेम्स

जेव्हा समोरचा शेवटी स्वीकारतो की त्याला त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा त्रास होतोय आणि हा स्वभाव बदलणे खूप गरजेचे आहे तेव्हा त्याने निम्मे युद्ध जिंकलेले असते.

या डिसऑर्डर साठी अनेक ट्रीटमेंट उपलब्ध आहेत पण ज्यांना काही कारणास्तव थेरपिस्ट कडे जाणे शक्य नाही त्यांच्यासाठी आज एक छोटे सेल्फ हेल्प गाईड present करतो.

सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा – या वर काम करताना बाकीचे लोक काय विचार करतात हे पूर्णपणे इग्नोर करणे.

 1. तुम्ही ट्रिगर कसे होता ते शोधा, काही ठराविक शब्द, परिस्थिती किंवा वागणूक यांमुळे तुमचे वागणे अचानक टोकाचे होते यांना आपण ट्रिगर म्हणतो तेच आपल्याला शोधून लिहून ठेवायचे आहेत. अगदी छोटी गोष्ट पण avoid करायची नाही.
 2. एकदा यादी तयार झाली की मग पोटेन्शियल ट्रिगर शोधायचे
  उदा. तुम्हाला कुणी वाट बघायला लावलेले ट्रिगर करत असेल आणि तुमचा मूड बदलत असेल. तर नंतर बाहेर डेट किंवा मीटिंग साठी जाताना आपला मूड पुन्हा चेंज होऊ शकतो / आपण ट्रिगर होऊ शकतो हे आधीच समजून घेणे.
 3. आपल्याला स्वतः मध्ये काय बदल अपेक्षित आहेत ते लिहून घेणे.
 4. ट्रिगर झालो की आपली रिअँक्शन कशी असायला हवी ते इमॅजिन करणे. ( पोटेन्शियल ट्रिगर लिहिले की रात्री निवांत विचार करायचा की ही परिस्थिती आली तर मी शांत राहून ती कशी हाताळू )
 5. ॲक्शन delay करा, वेळ घ्या
  तुम्ही पूर्वी ट्रिगर झाले की जसे पटकन react होत होतात तसे न करता थोडा वेळ घ्या. पाणी प्या / पूर्वी अशी परिस्थिती असताना तुम्ही कसे react झालेले ते आठवून त्याचे तोटे आठवा. ( Patience is key)
 6. इमॅजिन केलेले मार्ग स्वीकारणे
  एकदा आपण आपली जुनी रिएक्शन delay केली मग नवीन reaction साठी आपल्याला वेळ मिळतो, पूर्ण शांत डोक्याने तुम्ही मुद्दा क्रमांक 4 मध्ये जो ideal रस्ता निवडला होता तो आठवा आणि मग रिॲक्ट करा.
 7. पहिल्याच दिवशी 100% यश मिळणार नाही, पण तुम्ही दिवसभरात किती ट्रिगर handle केले ते नोट करा आणि स्वतःला मार्क द्या.

प्रोसेस नक्कीच मोठी आहे यासाठी खूप वेळ आणि संयम असावा लागतो, कोणतीही सवय सुटायला वेळ लागतो त्यामुळे जर तुम्हाला बदल हवा असेल तर पूर्ण विश्वासाने दिलेले सगळ फॉलो करा.

सोबत शांत गाणी आणि वॉटर intake यांवर पण लक्ष द्या.

Need Help ? Talk to the expert now !

Counselling Psychologist
Scroll to Top