fbpx

Narcissistic personality disorder

images (1).jpeg
Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on skype
Share on whatsapp
Share on email
Share on print

ह्या लोकांना सतत admiration हवं असतं आणि स्वतःला superior समजणे आणि आपले स्ट्रगल थोडे वाढवून चढवून सांगणे , empathy ची कमतरता आणि दुसऱ्यांच्या वापर करून स्वतःला हवे ते करून घेणे असे अनेक symptoms यांच्यात आढळतात.

या डिसऑर्डर चे 2 प्रकार खूप कॉमन आहेत.

 1. Grandiose narcissists – ह्या प्रकारात मोडणारे लोक हे एक भपकेबाज आयुष्य जगत असतात, हे लोक overconfident नेचर आणि दुसऱ्यांच्या प्रती खूपच कमी सेन्सिटिव्ह असतात. सतत मी कसा ग्रेट आहे हे लोकांना दाखवून देतात. यांना relationship मध्ये जर हवे ते स्थान मिळाले नाही तर कधीही कारण न देता सोडून निघून जातात.
 2. Vulnerable narcissists – ह्या प्रकारात मोडणारे लोक हे भावनात्मक सेन्सिटिव्ह असतात. ह्यांना पूर्ण जाणीव असते की हे तितके superior नाहीत त्यामुळे आपल्या भापक्याचा फुगा केव्हाही फुटेल अशी भीती यांना असते. हे लोक कधी Superior तर कधी inferior फील करत असतात. बरेचदा स्वतःला विक्टिम समजून स्ट्रेस घेतात. Relationship बद्दल यांचे विचार कधीच stable नसतात, आपला पार्टनर आपल्या बद्दल काय विचार करतो आपली इमेज कशी आहे हा विचार सतत यांच्या मनात सुरू असतो, त्यामुळे हो लोक त्याच्या बद्दल खूप पझेसिव्ह आणि जेलस असतात. सतत डाऊट घेणे किंवा पार्टनर मित्रांशी बोलताना flirt च करतोय असे समजणे हे नकळत यांच्याकडून होते.

Narcissistic लोकं प्रेमात कसे पडतात हेच मला कोडे वाटते कारण यांचे स्वतःवरच खूप प्रेम असते, त्यांचे स्वतःवरच प्रेम एवढं जास्त असतं की आपल्या पार्टनर ला ते एक वेगळी व्यक्ती म्हणून बघत नाहीत तर granted घेतात. आपला पार्टनर हा आपल्या गरजा पूर्ण करायला आहे त्यांचा mindset असतो. Empathy चां अभाव असल्याने भावनांचा अनादर करणे ही त्यांच्यासाठी मोठी गोष्ट नसते.

हे लोक पहिल्या भेटीत किंवा सुरवातीच्या काळात खूप मोहक वाटतात, यांच्या पार्टनर ला वाटत की त्यांची चॉईस खूप छान आहे ते लकी आहेत की त्यांना एवढ्या स्पेशल पार्टनर मिळाला आहे. पण हळू हळू narcissists लोक नात्याचा पूर्ण ताबा घेतात, कोणतीही गोष्ट मनाविरुध्द झाली की मग लगेच hurt होणे , attention साठी मग ड्रामा करणे आणि चूक पूर्ण समोरच्याची कशी आहे हेच ते दाखवत असतात.
सोप्या भाषेत सांगायचं तर अश्या लोकांच्या प्रेमात पडणे सोपे असते सुरवातीच्या काळात नाते खूप सुंदर असते पण नंतर हे नाते टिकवणे खूप कठीण होते. हे लोक भावनांचे manipulation करण्यात एक्स्पर्ट असतात.

यांचे पार्टनर हे सतत एकटे एकटे फील करत असतात, आपला वापर केला जातोय किंवा आपण एकटेच नाते निभावत आहात असे वाटत असते. त्यात जर सेल्फ esteem लो असेल तर स्वतःलाच दोषी समजू लागतात आणि अजून डिप्रेस्ड फील करू लागतात.

जर कुणी अश्या व्यक्तिमत्त्व असलेल्या व्यक्ती सोबत relation मध्ये असेल तर तुम्ही काय करू शकता ?

 1. Narcissist लोक त्यांना हवे तेव्हा रूप किंवा वागणूक बदलतात म्हणून त्यांना judge करताना किंवा consider करताना त्यांचा मूळ स्वभाव लक्षात घ्यावा.
 2. सोबत असताना थोडा फोकस / स्पॉटलाईट स्वतःवर पण घ्यावा. स्वतःच्या अस्तित्वाला इग्नोर करू नये. ( प्रेम आहे म्हणून तुम्ही त्यांना फिक्स करायचा ठेका घेतला नाही)
 3. जेव्हा कधी इग्नोर झाल्या सारखं वाटेल तेव्हा आपला मुद्दा मांडा, प्रत्युत्तर द्यायला शिका.
 4. Don’t let them cross the limits, boundaries set कारण
 5. तुम्ही boundry सेट केली की मग ते स्वतःचे काही नवीन मुद्दे घेऊन येतील, तुम्ही कसे चूक आहात ते सांगतील, तुम्हाला गिल्टी फील करवतील पण तुम्ही ठाम रहा.
 6. तुम्ही कायम चुकीचे आहात हे समजणे सोडून द्या.
 7. एक सपोर्ट सिस्टीम तयार ठेवा, स्वतःचे मानसिक संतुलन बिघडून देऊ नका.
 8. त्यांनी दिलेल्या प्रॉमिस पेक्षा कृती वर जोर द्या.
 9. या लोकांना ट्रीटमेंट ची गरज असते हे समजून घ्या आणि प्रोफेशनल हेल्प घेण्यासाठी त्यांना समजावून सांगा.
 10. तुम्हाला मदत हवी आहे असे वाटत असेल तर आधी स्वतःचा विचार करा.

नाते कधी संपवावे / move on कधी करावे ?

 1. जर नात्यात abusing, insult, धमक्या आणि आरडाओरडा हे सतत होऊ लागले.
 2. काही चुकल्यास सतत तुम्हाला दोष मिळत असेल तर.
 3. तुमच्यावर अनेक निर्बंध किंवा बंधने असतील तर.
 4. शारीरिक किंवा मानसिक हिंसा होत असेल तर.
 5. स्वतःचे अस्तित्व गमवल्या सारखे वाटत असेल तर.

प्रेम नक्कीच महत्वाचे असते पण नात्यात एक तर्फी प्रयत्न चालत नाहीत हे कृपया लक्षात घ्या, nothing is more important than mental health.

Need Help ? Talk to the expert now !

Counselling Psychologist
Scroll to Top