fbpx

Postpartum depression

बाळाच्या जन्मानंतर परिवारात आनंद आणि उत्साहाचे वातावरण असते, पण या आनंदाच्या परिस्थिती मध्ये देखील जगातील साधारण 60% माता या postpartum depression म्हणजेच ppd चा शिकार झालेल्या असतात. प्रसूतीनंतर साधारण 2 ते 3 दिवस मूड स्विंग (Baby Blues) होत असतात पण जर मूड स्विंग आणि चिडचिड 2 आठवड्यापेक्षा जास्त वेळ राहत असेल तर त्याकडे लक्ष देणे गरजेचे असते. आज याच विषयी अधिक माहिती आपण घेऊ.

Postpartum depression ची कारणे आणि लक्षणे –

अती प्रमाणात चिंता, चिडचिड, उगाचच रडू येणे, confusion, irritability, कमी झालेली भूक आणि झोप ही ppd ची लक्षणे आहेत. ज्या स्त्रिया प्रसूती आधी एकदम शांत आणि संयमी असतात त्या या सर्व अनुभवांनी चकित होतात, काही रिसर्च नुसार ज्या स्त्रियांना anxiety जास्त असते त्यांना इतरांच्या तुलनेत postpartum depression होण्याचे चान्सेस जास्त असतात. बाळाचा जन्म झाल्यानंतर पुढे सर्व ठीक होईल का ?, त्याचा सांभाळ करायला मी समर्थ आहे का ? अशी चिंता (anxiety) अनेकदा postpartum depression चे मुख्य कारण असते त्याच सोबत एकटेपणा आणि परिवाराकडून न मिळणारा सपोर्ट देखील मनात चिंता निर्माण करतात.

जवळजवळ 50% केसेस मध्ये pregnancy मध्येच ही लक्षणे दिसायला सुरुवात होते, तर काही केसेस मध्ये बाळाच्या जन्मानंतर काही महिन्यांनी लक्षणे दिसायला लागतात. तज्ज्ञांच्या नुसार प्रसूती आधी 6 महिने ते प्रसूती नंतर 1 वर्ष या कालावधीत postpartum depression होऊ शकते.

Postpartum depression ची तीव्र लक्षणे कोणती ?

तीव्र लक्षणे असणाऱ्या व्यक्ती स्वतःला harm करून घेणे किंवा बाळाची हत्या करणे असे विचार करू शकतात. त्यांना सतत वाटत असते की आयुष्यात काहीच उरले नाही, निराश जीवन आहे. जर मुलीच्या जन्मानंतर आई ला खूप त्रास दिला गेला आणि तिला ppd असेल तर तीव्र होण्याची शक्यता जास्त असते.

Postpartum depression साठी रिस्क फॅक्टर कोणते ?

रिसर्च नुसार वैवाहिक जीवन, सोशल लाईफ किंवा मित्र कमी असणे / अजिबात नसणे, substsnce abuse/ व्यसन, होर्मोनाल imbalance, डिप्रेशन किंवा PTSD, जवळच्या व्यक्तीचा मृत्यू किंवा विरह हे घटक देखील Ppd साठी रिस्क फॅक्टर असतात.

पुरुषांना देखील postpartum depression होऊ शकते का ?

Postpartum depression चे शिकत पुरुष देखील होतात. डिप्रेशन, parental abuse, बेताची आर्थिक परिस्थिती, ट्रॉमा तसेच testosterone ची कमतरता असे रिस्क फॅक्ट्स ppd होण्यासाठी कारणीभूत असू शकतात. पण पुरुष असल्याने भावना तितक्या चांगल्या प्रकारे मांडू शकत नाहीत त्यामुळे ते कळून येत नाही, अश्यावेळी त्यांनी देखील मार्गदर्शन घेणे योग्य असते.

सामाजिक प्रेशर आणि stigma मुळे Postpartum depression तीव्र होऊ शकते का ?

मी एक उत्तम आई होऊ शकते का ?, मला सर्व जबाबदाऱ्या पार पाडणे जमेल का ? मी परफेक्ट असेन का ? असे अनेक प्रश्न आणि सोबत आजूबाजूच्या लोकांनी सांगितलेले आणि शिजवलेले अनेक कॉन्सेप्ट यामुळे नवीन पालक अगदी कन्फ्युज असतात त्यात जर कुणी Postpartum depression मध्ये असेल तर त्यांची लक्षणे त्यांना सतत भासवून देतात की तुम्ही तुमच्या बाळावर अन्याय करत आहात. तुम्ही असे चिडचिड करत राहिलात तर त्यावर चुकीचे संस्कार होतील. या प्रेशर मुळे परिस्थिती अजून चिघळते.

Postpartum anxiety ही Postpartum depression पेक्षा वेगळी असते, या मध्ये पालक डिप्रेस्ड नसतात पण अती चींते मुळे कधी कधी त्यांना panic अटॅक येऊ शकतात किंवा तात्पुरते/ एखाद्या घटनेपुरते उदास वाटू शकते. उदा. बाळ 3 महिन्याचे असताना अचानक नोकरी जाणे. मग नवीन नोकरी मुळे पर्यंत चिंता असते. त्याला आपण anxiety म्हणू शकतो.

मूल दत्तक घेतल्यानंतर देखील Postpartum depression होऊ शकते.

Postpartum depression- निदान आणि उपचार

लक्षणात सांगितल्या प्रमाणे ppd असणाऱ्या माता या सतत रडत असतात, त्यांना झोप येत नाही, नीट भूक लागत नाही. जेव्हा असे होते तेव्हा मी का आई झाले असे विचार मनात येऊ शकतात. दुर्लक्ष केल्यास तीव्र लक्षणे देखील समोर येतात. त्यामुळे योग्य वेळी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेणे प्रचंड गरजेचे असते, जर माता तयार होत नसेल तर तिच्या परिवारातील अन्य सदस्यांनी पुढाकार घ्यायला हवा.

Postpartum depression चा उपचार बहुतांश वेळा टॉक थेरपी, अँटी डिप्रेशन औषधे, hormonal थेरपी आणि सपोर्ट ग्रूप पद्धतीने केला जातो.

Postpartum depression होऊ नये म्हणून योग्य सेल्फ केअर रूटीन असणे गरजेचे आहे, योग्य प्रमाणात झोप, पोषक अन्न आणि व्यायाम हे अत्यावश्यक आहे. त्याच सोबत बाळासाठी प्लॅनिंग करताना परिकराची आर्थिक आणि मानसिक स्थिती योग्य असायला हवी. घरात वाद असताना बाळाचा विचार अजिबात करू नये.

Postpartum depression पेक्षा Postpartum psychosis हा भयानक आजार असून यात मातेला कळतच नाही की ती अडचणीत आहे. त्यांना भास होतात की कुणीतरी बोलवत आहे, किंवा समोर आहे इत्यादी. ही स्थिती शोधणे खूपच कठीण असते पण सकारात्मक गोष्ट अशी की 1000 पैकी 1 किंवा 2 माता Postpartum psychosis चा शिकार होतात.

योग्य मार्गदर्शन घेतले तर Postpartum depression सहज ठीक होते.

Need Help ? Talk to the expert now !

Counselling Psychologist
Scroll to Top