fbpx

बदलाची प्रक्रिया

एखादी सवय बदलायची ठरवली आणि ती अगदी सहज पूर्ण झाली तर ? समजा तुम्ही आज रात्री झोपताना ठरवले की उद्या पासून मी फक्त पौष्टिक अन्न खाणार आहे आणि सकाळी उठल्यापासून तसेच झाले तर किती अडचणी दुर होतील. पण आपल्या सर्वांना माहीत आहे की बदल इतक्या सहज होत नाही, बदलाची प्रक्रिया नेमकी कशी असते ते आजच्या लेखात पाहू.

बदल ही एका दमात होणारी घटना नसून ती एक प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया आपण सहज समजून घेऊन स्वतः मध्ये आणि आपल्या प्रियजनांमध्ये बदल घडवू शकतो. ही प्रक्रिया 2005 मधील प्रोचास्का आणि दिक्लेमेंटे यांच्या मॉडेल वर आधारित असून यात बदल होण्यासाठी कृती करण्या अगोदरच्या पायऱ्या नमूद करण्यात आल्या आहेत.

बदलाच्या पाच पायऱ्या

1️⃣ Pre contemplation – पहिली पायरी म्हणजे आपल्या समस्ये बाबत जागरूक नसणे, जेव्हा एखाद्या व्यक्तीला त्याच्या वागण्यात कोणताच प्रोब्लेम जाणवत नाही. मित्र, परिवारातील लोक किंवा प्रिय व्यक्ती सतत जाणीव करून देत असले की तुला अमुक अमुक सवय बदलायची गरज आहे तरी व्यक्ती ते नाकारते आणि बदलाची गरज नाही असे म्हणते तेव्हा ती या पायरी मध्ये असते. अश्या वेळी ती चुकांना justify करत असते. उदा. किचन मध्ये काम करताना एखादा डबा उघडा ठेवत असल्यास माझ्या कामाची तीच पद्धत आहे असे बोलणे. साधारण 6 महिने ही अवस्था असते.

2️⃣ Contemplation – या पायरी मध्ये व्यक्ती स्वतःच्या समस्येबाबत जागरूक होते, पण बदल करायचा की नाही याबद्दल ठाम नसते, सतत द्विधा मनस्थिती घेऊन वावरत असते. बदल केल्याने कोणते फायदे आणि तोटे होतील याचा ठोकताळा यांच्या मनात सतत सुरू असतो. उदा. मला पौष्टिक अन्न खाणे गरजेचे आहे पण फळे आणि सुका मेवा खूपच महाग आहे. ही अवस्था द्विधा मनस्थिती ची असल्याने काही महिने ते वर्ष सुद्धा असू शकते.

3️⃣ Preparation – या पायरी मध्ये व्यक्ती बदलासाठी पूर्णपणे तयार होते, ते स्वतःशी कमिटमेंट करतात. बदल काय आणि कसा करायचा हे ठरवून कदाचित त्यासाठी त्यांचे छोटे प्रयत्न देखील सुरू झालेले असतात. उदा. मी स्मोकींग बंद करणार आहे, मी त्यासाठी निकोटिन chewing gum विकत घेतले आहे आणि सिगरेट द्या असे सांगितले देखील नाही. ही पायरी म्हणजे कृती करण्याची रंगीत तालीम असते.

4️⃣ Action – या पायरी मध्ये व्यक्ती त्यांची वागणूक बदलायच्या दृष्टीने पाऊले उचलतात.  येथे त्यांची कमिटमेंट लेव्हल खूपच strong असते. या पायरी मध्ये व्यक्ती ही सेल्फ directed असते, आजूबाजूचे लोक बोलत आहेत म्हणून ते कोणतीही गोष्ट करत नाहीत, साधारण 6 महिने ही अवस्था असते.

5️⃣ Maintenance – ही पायरी सर्व पायाऱ्यांमध्ये थोडी कठीण मानली जाते पण तितकीच महत्वाची असते. एखाद्याच व्यक्तीने बदल करताना अँक्शन स्टेज मध्ये असताना घेतलेले निर्णय तो टिकवून ठेवणे यावावर हे सर्व यावर अवलंबून असते. उदा. बाहेरील पदार्थ पूर्ण बंद केले आहेत, पण कुणीतरी खात आहे किंवा तो पदार्थ डोळ्यासमोर दिसत आहे तर cravings येत असतील तर आपला बदल योग्य प्रकारे मेन्टेन करू शकलो नाही हे समजावे.

ह्या सर्व पायऱ्या सांगण्याचा उद्देश इतकाच की एखादी व्यक्ती जर स्वतःमध्ये बदल करत असेल तर ती नेमक्या कोणत्या स्टेज मध्ये आहेत ते कळायला मदत होईल आणि ते जर तिसऱ्या किंवा पुढील पायरीवर असतील तर त्यांना त्यांचे छोटे छोटे यशस्वी प्रयत्न साजरे देखील करता येतील.

पाचही पायऱ्यां माहीत असणाऱ्या व्यक्तींचे वागणे थोडे वेगळे असते आणि जगाकडे तसेच स्वतःकडे बघण्याच्या दृष्टिकोन देखील बदललेला असतो. उदा

✳️ Pre contemplation – या स्टेज मध्ये असणारी व्यक्ती ही सतत लोकांचे ऐकून घेते, त्यांची मते समजून घेते आणि स्वतःला काय बदलायची गरज आहे ते ठरवू लागते म्हणजेच contemplation स्टेज कडे वळू लागते.

✳️ Contemplation – येथे व्यक्ती स्वतःच्या वागण्याच्या लोकांवर काय आणि कसा परिमाण होतो हे नीट अनुभवते. त्यांची द्विधा मनस्थिती येथे कमी इफेक्ट करते.

✳️ Preparation – येथे व्यक्ती योग्य प्लॅन बनवून ठेवते आणि त्यात येणाऱ्या संभाव्य अडचणी सोडवायचा प्रयत्न करते.

✳️ Action – येथे व्यक्ती स्वतःचे ट्रिगर शोधून ते avoid करणे सुरू करते आणि बदलासाठी योग्य वातावरण तयार करते.

✳️ Maintenance – येथे व्यक्ती सवय बदलली तेव्हापासून कोणते सकारात्मक बदल होत आहेत ते आठवते आणि पुन्हा चुकीची सवय लागू नये म्हणून शरीर आणि मनाला रोखले जाते.

फक्त स्वतःसाठी नाही तर आपल्या भोवती कुणी बदलत असेल तर ते नेमके कोणत्या स्टेज वर आहोत हे समजून घेतले तर समोरच्या व्यक्तीला मदत करता येते.

Need Help ? Talk to the expert now !

Counselling Psychologist
Scroll to Top