fbpx
images (1).jpeg
Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on skype
Share on whatsapp
Share on email
Share on print

बलात्कार किंवा रेप ही घटना victim साठी खूपच अपमानास्पद आणि ट्रॉमा निर्माण करणारी असते. बलात्कार पीडित व्यक्ती ही स्वतःचा तिरस्कार करू लागते, अनेकदा त्यासाठी स्वतःला दोषी समजते आणि या ट्रॉमा मुळे post-traumatic syndrome disorder (PTSD) चा शिकार होते, तिचे मानसिक आरोग्य बिघडते.

एखाद्या व्यक्तीने बलात्कार का केला असेल ? हा प्रश्न अनेकदा आपल्याला त्रास देतो. हा खूप जटिल प्रश्न आहे, ज्याची अनेक उत्तरे असू शकतात. एखादा बलात्कारी निर्माण होण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत असतात.

बलात्कारी किंवा लैंगिक शोषण करणारा व्यक्ती कोणीही असू शकतो. फक्त चेहरा बघून आपण अंदाज अजिबात लावू शकत नाही. अगदी सोज्वळ दिसणारे सुद्धा बलात्कार करू शकतात.

अमेरिकेचे एक क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट Dr. Samuel D. Smithyman यांनी 1970 मध्ये 50 बलात्कारी लोकांचे इंटरव्ह्यू घेतले, या 50 व्यक्तींचे सामाजिक स्थान, कौटुंबिक परिस्थीती, शिक्षण आणि व्यक्तिमत्व वेगवेगळ्या प्रकारची होती. यांचे interview सुरू असताना dr ना प्रत्येकवेळी एकच गोष्ट जाणवली की या मोठ्या अपराधाबद्दल बद्दल बोलताना त्यांना तसूभर देखील फिकीर आणि अपराधी भावना नव्हती.

बलात्काराची कारणे जरी अस्पष्ट असली तरी प्रत्येक बलात्कारी व्यक्ती मध्ये पुढील 3 लक्षणे आढळतात.
✳️ सहानुभूतीची भावना नसणे ( Lack of empathy)
✳️ नर्सिसिस्ट स्वभाव
✳️ महिलांबाबत शत्रुत्व / चुकीच्या समजुती असणे

Toxic masculinity
आपला समाज हा पुरुषप्रधान आहे. परंतु या पुरुषप्रधान संस्कृतीचा अर्थ अनेक लोक चुकीचा घेतात, त्यांच्या मते स्त्रीला दुय्यम वागणूक देणे हे पुरुषार्थाचे लक्षण आहे. अश्या वेळी बरेचदा लैंगिक छळ हा शारीरिक समाधानासाठी/ शरीर सुखासाठी नाहीतर स्त्रियांना dominate करून स्वतःचे वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी केला जातो.
एखाद्याचे पुरुषत्व हे तो सेक्शुअली किती अनुभवी आहे यावरून judge केले जाते या प्रेशर
मुळे तरुण पिढी स्वतःचे पुरुषत्व सिद्ध करायला कोणत्याही थराला जातात.

बलात्कार म्हणजे शारीरिक भूक की एक हिंसा ?

सर्वात आधी मी नमूद करू इच्छितो की बलात्कार हा कोणताही मानसिक आजार नाही, तो एक अक्षम्य अपराध आहे, काही बलात्कारी हे मानसिक रुग्ण असू शकतात, पण असा कोणताच मानसिक आजार नाही ज्यात व्यक्तीला बलात्कार करण्याची अनियंत्रित इच्छा होईल.

यावर एक वेगळे मत देखील आहे. जिवशात्रज्ञ Randy Thornhill आणि evolutionary anthropologist Craig Palmer ह्यांच्या थियरी नुसार बलात्काराचा मुख्य उद्देश हा संभोग आहे. त्यांच्या मते बलात्कार ही आपल्यात झालेली एक उत्क्रांती असून, पुरुषाची लैंगिक क्षमता जागृत ठेवायला हा बदल झालेला आहे. प्रजनन योग्य स्त्रियांना पाहून बलात्काराची इच्छा होणे हे नैसर्गिक आहे असे त्यांचे मत आहे.

या सिद्धांतावर माझे मत – माणूस हा प्राणी असला तरी तो भावना प्रधान आहे, सामाजिक आयुष्यात हा सिद्धांत स्वीकारणे म्हणजे आपण अजूनही जनावर आहोत हे सिद्ध करणे झाले. प्रजनन हा आयुष्याचा भाग असेल पण तेच आयुष्य असू शकत नाही.
त्यांच्या पुस्तकाला प्रचंड विरोध झाला असून, त्यात अनेक पुरावे चुकीच्या पद्धतीने मांडल्याचे निदर्शनास आले आहे.

अनेक सायकॉलॉजिस्ट, फेमिनिस्ट, सोशल सायंटिस्ट यांच्यामते बलात्कारासाठी हिंसेची भावना, शक्ती आणि संधी या 3 गोष्टी कारणीभूत असतात. बलात्कार कधीही समोरच्या व्यक्तीने उत्तेजीत केल्यामुळे होत नाही तर ते दुसऱ्याला नियंत्रित आणि dominate करण्याच्या उद्देशाने किंवा स्त्रियांबद्दल द्वेष/ शत्रुत्व अशा भावनेने होत असतात.

Hostility toward women
बलात्कारी नेहमी स्त्रियांना एक वस्तू म्हणून पाहत असतात, स्त्रियांचे काम पुरुषांची कामवासना भागवणे आहे असा त्यांना पक्का समज असतो. अनेक चुकीचे विचार ते मनात बाळगून असतात. उदा. बाई ने दिलेला नकार हा कधीच नकार नसतो, त्यात कुठे तरी त्यांचा होकार असतो. , कुठेतरी चित्रपट आणि मालिका यांनी हे मनावर बिंबवले गेले आहे.

3 बलात्कार केलेला दोषी म्हणतो की मला एखादी स्त्री जेव्हा नाही म्हणते तेव्हा ते चॅलेंज वाटते आणि मग मी जेव्हा तिच्यावर जबरदस्ती करतो तेव्हा मला माझ्या शक्ती वर आणि पुरुषार्थावर अभिमान वाटतो, मनाला शांती मिळते.

स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी दुसऱ्याला अमानुष वागणूक देणे, जबरदस्ती करून स्वतःचे स्थान अबाधित ठेवणे यासाठी बलात्कार करण्याचा घटना सुद्धा लक्षणीय आहेत. नर्सिसिस्म आणि पुन्हा पुन्हा बलात्कार करणारे लोक यांच्यात हाच दुआ आहे, दोघांना इतरांना अमानुष वागणूक देणे फार आवडते.

स्त्री चे शरीर म्हणजे उपभोगाची वस्तू आहे असे समज दूर करणे देखील गरजेचे आहे, इंटरनेट वरील कंटेंट, पोर्न आणि चित्रपट तसेच मालिका यांच्यातील दृश्य यामुळे स्त्री बद्दल चुकीचे समज होतात. तू चीज बड़ी है मस्त मस्त / चिकनी कमर पे तेरी मेरा दिल फिसल गया अशी गाणी यामुळे देखील स्त्री कडे फक्त वस्तू म्हणून पाहिले जाते.

बलात्कारी लोकांचे प्रकार –

संधीसाधू – या प्रकारात येणारे लोक जिथे संधी मिळेल तिथे लैंगिक अत्याचार करतात. दारूच्या नशेचा किंवा एकांताचा फायदा घेऊन दुष्कृत्य करतात यांचा सेल्फ कंट्रोल फार कमी असतो.

Sadistic rapist – हे victim ला अपमानित करण्यासाठी बलात्कार करतात.

Vindictive rapist – एखाद्या स्त्री कडून मिळालेले वाईट अनुभव, तिने दिलेला नकार किंवा अश्या कोणत्याही घटनेमुळे यांना स्त्रियांप्रती एक चीड निर्माण होते, तोच राग हे लोक बलात्कार करून बाहेर काढतात.

समाजात स्त्री ला मिळत असलेली किंमत आणि त्यांना मिळणाऱ्या संधी यांमुळे देखील अनेक लोकांना मत्सर निर्माण होतो. स्त्री चे स्थान दुय्यम आहे हा समज मग रागात रूपांतरित होतो आणि मग स्वतःचे वर्चस्व स्थापन करायला सुद्धा बलात्कार केले जातात.

बलात्कार करणारे खूप कमी वेळा स्वतःच्या गुन्हा मान्य करतात, आजूबाजूची परिस्थिती किंवा समोरच्याची चूक कशी होते हे पटवून देण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जातो. त्याचबरोबर victim सुद्धा समाजाकडून वाईट वागणूक मिळेल किंवा कलंक लागेल या भीतीने याची वाच्यता करत नाहीत त्यामुळे अनेक बलात्कारी मोकाट फिरत असतात.

बलात्कार हा स्त्री मुळे कधीच होत नाही, त्यामुळे यात स्त्रियांची चूक आहे असे गृहीत धरणे चुकीचे आहे. स्त्री पूर्ण कपड्यात असली तरी बलात्कार होतात, ती 3 वर्षाची असली तरी होतात आणि 60 वर्षाची असली तरीही.

बलात्कार थांबवण्याचे काही मार्ग.
✳️ नेहमी consent घ्या. शरीर संबंध प्रस्थपित करताना पार्टनर ची सहमती नेहमीच आवश्यक आहे, अगदी लग्नानंतर पण.
✳️ चुकीच्या संकल्पना विसरा – पुरुष म्हणजे स्ट्राँग आणि स्त्री म्हणजे weak हा समह चुकीचाच आहे तो दूर करा, स्त्री आणि पुरुष यांचे सामाजिक स्थान सारखेच आहे हे स्वीकारणे फार गरजचे आहे.
✳️ स्वतःचे अवलोकन करा – पुरुषत्व म्हणजे काय हे नीट समजून घ्या, स्त्री ला दुय्यम समजणे तिला dominate करणे म्हणजे पुरुष असणे नाही.
✳️ Victim blame थांबवा – नेहमी समोरच्याला दोष देऊ नका, तिचे कपडे तोकडे आहेत, तिने माझ्यासोबत ड्रिंक केले त्यामुळे मला सिग्नल मिळाले तीच दोषी आहे, हे थांबवा.
✳️ चुकीच्या गोष्टी सहन करू नका – आजूबाजूला काही चुकीचे होत असेल तर प्रती उत्तर द्या. कुठेही eve teasing होत असेल तर त्याला आळा घाला.
✳️ लैंगिक शिक्षण द्या – आपल्या पुढच्या पिढीला योग्य प्रकारे लैंगिक शिक्षण द्या, म्हणजे ते चुकीची माहिती घेऊन चुकीचा मार्ग स्वीकारणार नाहीत.
✳️ बलात्काराचे बळी ठरलेले लोक यांना योग्य वागणूक द्या, त्यांना समाजात मानाचे स्थान मिळवून द्या.
✳️ घरात स्त्री सोबत कामे करा, पुढची पिढी आपल्याला बघून शिकणार आहे, लहान मुलांसमोर कधीही स्त्री दुय्यम आहे असे भासावणारे विधान किंवा कृती करू नका.
✳️ मुलींना bad टच बद्दल सांगा, teen age मध्ये गेल्यावर पुरुष नातेवाईक किंवा अन्य कोणत्याही पुरुषाच्या मांडीवर बसू देऊ नका. जर मुली कोणत्या नातेवाईकांना भेटणे टाळत असतील तर त्यांच्याशी बोला.
✳️ शारीरिक भावना कंट्रोल करणे आणि स्वतःला satisfy करणे शिकवा.

बलात्कार रोखण्याठी शिक्षा हा एकमेव उपाय अजिबात नाही, आपल्याला याची पाळमुळे खणून काढायची आहेत आणि ही किड कायमची संपवायची आहे. त्यासाठी स्त्री आणि पुरुष हे एकाच रथाची दोन चाके आहेत हे समाजात रूढ होणे गरजेचे आहे.

Need Help ? Talk to the expert now !

Counselling Psychologist
Scroll to Top