fbpx

Self affirmation

images.jpeg
Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on skype
Share on whatsapp
Share on email
Share on print

लेख वाचण्यापूर्वी एक छोटा व्हिडिओ नक्की पहा ही विनंती.

माझ्या क्लाएंट आणि स्टुडंट्स ना मी प्रत्येक सेशन मध्ये Self affirmation चे महत्व सांगतो,व्हिडिओ मध्ये तुम्ही एक उदाहरण पाहिलेच असेल, आपण बरेचदा स्वतःबद्दल जसा विचार करतो / लोकांकडून एकतो तसे आपण बनत जातो, बेसिक human नेचर आहे की आपल्या मनात सर्वात आधी negative विचार येतात त्यांना दूर करून स्वतःचा कॉन्फिडन्स वाढवायला Self affirmation हा एक उत्तम पर्याय आहे.

स्वतःची स्तुती करणे आपल्याला थोडे विचित्र वाटते, किंवा खरच हे काही शास्त्र आहे का ? असा संशय अनेक लोकांना येतो. तर या मागे असलेले शास्त्रीय कारण सुद्धा आज आपण जाणून घेणार आहोत.

सर्वात आधी सकारात्मक / positive self affirmation म्हणजे काय ते पाहू.
आपल्या मनातील नकारात्मक विचारांना दूर करायला तयार केलेली सकारात्मक वाक्ये म्हणजेच positive self affirmations, हे करण्यासाठी कोणतेही साहित्य लागत नाही, बस तुम्हाला आवडतील ती सकारात्मक वाक्ये निवडा आणि ती रिपीट करत रहा.
या वाक्यांचा उपयोग स्वतःला प्रेरणा द्यायला, सेल्फ इस्टीम वाढवायला केला जाऊ शकतो, जेव्हा तुमच्या मनात नकारात्मक विचार येतील तेव्हा ह्या सकारात्मक वाक्यांनी तुम्ही त्यांवर मात करू शकता.

या पद्धतीला कोणता वैज्ञानिक आधार आहे का ?
हो, ही पद्धत म्हणजे कोणताही चमत्कार नाही, सकारात्मक वाक्ये नियमित प्रॅक्टिस केल्याने त्याचे दूरगामी आणि सकारात्मक परिणाम दिसू लागतात. MRI चा वापर करून जेव्हा या पद्धतीचा नियमित अवलंब करणाऱ्या लोकांना observe केले गेले तेव्हा संशोधकांना जाणवले की ही वाक्ये बोलत असताना त्यांच्या मेंदू मध्ये सकारात्मकता आणि आनंदाची अनुभूती देणारे हार्मोन स्त्रवत आहेत.

Self affirmation चे फायदे:

 • Behavioural disorder मध्ये एक उपयुक्त पर्याय
 • दैनंदिन जीवनात येणारा स्ट्रेस आणि minor डिप्रेशन कमी होते.
 • सेल्फ इस्टीम वाढीस लागते.
 • आत्मविश्वास वाढतो.
 • कामाच्या ठिकाणी प्रॉडक्टिविटी वाढते, कामे वेळेत पूर्ण होतात.
 • व्यसन किंवा चुकीच्या सवयींवर मात करता येते.
 • गोल अचिव करण्यात मदत होते.
 • फोबिया / भीती दूर करता येते.
 • भूतकाळातील वाईट घटना / अपघात विसरता येतात.

सकारात्मक वाक्ये आणि गोल यांची सांगड घातली तर मिळणारे रिझल्ट अजून छान असतात.

Self affirmation थेरपी कशी अमलात आणावी ?

जगात उपलब्ध सर्व थेरपी पैकी सर्वात सोपी ही थेरपी आहे, यासाठी फक्त आपली इच्छाशक्ती लागते.

सर्वात आधी सकारात्मक वाक्ये बनवा:
वाक्ये बनवत असताना लक्षात घ्यायचे घटक
 • कुठेही नकारात्मक शब्द वापरू नका: जसे ” मी कधीच चिडत नाही” या ऐवजी ” मी कायम शांत असतो”
 • तुम्हाला तुमच्या जीवनात काय बदलायचे आहे ते ठरवा. जसे: संयम वाढवायचा आहे, नातेसंबंध सांभाळायचे आहेत.
 • Realastic /साध्य होतील अशी वाक्ये असावीत – उदा तुम्ही करताय त्या कामासाठी तुम्हाला पगार वाढवून हवा आहे तर तुम्ही त्यासाठी स्वतःला प्रेरणा देणारे वाक्य लिहू शकता पण त्या ठिकाणी तुम्ही पगार 1 कोटी असावा असे लिहून फायदा नाही किंवा हवेत उडता यावे असे लिहूनही फायदा नाही.
 • नकारात्मक विचारांना सकारात्मक करून लिहा – समजा सतत मनात येत असेल की ” मी talented नाही” तर वाक्यातील नाही काढून ते सकारात्मक करावे ” मी talented आहे”.
 • वर्तमान काळात ( Present tense) सर्व वाक्य असावीत. बोलताना पण नेहमी ती वर्तमान काळातच बोलावीत म्हणजे तुम्ही त्या परिस्थिती मध्ये आहात असेच समजावे. उदा. माझा इंटरव्ह्यू छान झाला आहे हे वाक्य इंटरव्ह्यू देण्या आधी रिपीट करणे.
 • शब्दांना भावनांची जोड द्या – ही वाक्ये बोलताना नेहमी त्यांना भावनांचा ओलावा द्या.

वाक्ये कधी आणि कशी रिपीट करावीत ?

ही वाक्ये उच्चरण्यापूर्वी 1 ग्लास पाणी प्यावे.
वाक्ये बोलताना शक्यतो आपलाच आवाज आपल्याला एकु येईल अशा आवाजात म्हणावीत.

 • सकाळी उठल्यानंतर आरशासमोर स्वत कडे पाहून.
 • रात्री झोपी जाताना मनातल्या मनात बोलत बोलत झोपी जावे.
 • मनात नकारात्मक विचार येऊ लागले की.
 • एकटे बसले असाल तेव्हा.
 • गोल किंवा मीटिंग/ इंटरव्ह्यू संबंधी असतील तर त्या आधी.
 • दिवसातून वाटेल तेव्हा.
 • meditation करताना ( meditation संपत आले की)

तुम्हाला हवे असल्यास तुम्ही रेकॉर्ड करून ठेवू शकता आणि हवे तेंव्हा पुन्हा प्ले करू शकता. , काही लोक याचा तक्ता करून रूम मध्ये किंवा ऑफिस डेस्क वर लावतात जेणे करून सतत नजरेसमोर राहील. मी सल्ला देतो की ही वाक्ये बोलत असताना पाठी एक संगीत असावे.
तुम्ही संगीत या लिंक वरून डाऊनलोड करू शकता :

काही सकारात्मक वाक्ये.
 • I am successful.
 • I am confident.
 • I am powerful.
 • I am strong.
 • I am getting better and better every day.
 • All I need is within me right now.
 • I wake up motivated.
 • I am an unstoppable force of nature.
 • I am a living, breathing example of motivation.
 • I am living with abundance.
 • I am having a positive and inspiring impact on the people I come into contact with.
 • I am inspiring people through my work.

Need Help ? Talk to the expert now !

Counselling Psychologist
Scroll to Top