fbpx

तुमचा स्वतःवर विश्वास आहे का ?

जेव्हा आपण स्वतःवर विश्वास ठेवतो तेव्हा आपल्याला आपले ध्येय प्राप्त करणे सोपे जाते, पण याच नाण्याची दुसरी बाजू म्हणजे स्वतःवर कमी विश्वास असला तर आपण ध्येयाकडे दुर्लक्ष करतो, आपण यशस्वी होणार नाही अशी भीती मनात निर्माण होते आणि अनेकदा तीच भीती आपला घात देखील करते.

समजा आपल्याला एका ठिकाणाहून दुसरीकडे जायचे आहे आणि आपण फक्त गाडीत बसलो आहोत तर पुढे जाऊ का ? अजिबात नाही तर आधी  गाडी सुरू करावी लागेल तसेच स्वतःवर विश्वास ठेवणे म्हणजे गाडीत बसून तिला स्टार्टर करण्यासारखे आहे, अनेकदा स्टार्टर देणे सोपे असते पण काही वेळा आपली विचारधारा, स्वभाव आणि कृती सकारात्मक नसतील तर आपल्याला स्वतःला धक्का मारावा लागतो पण एकदा ही गाडी सुरू झाली की मग प्रवासाचा आनंद देखील मनमुराद अनुभवता येतो.

स्व – विश्वासाचे मुख्य घटक

✳️ सेल्फ वर्थ – स्वतःची value/ किंमत समजून घेणे.
✳️ सेल्फ कॉन्फिडन्स – स्वतःच्या कौशल्य आणि गुणांबद्दल असलेला सकारात्मक दृष्टिकोन.
✳️ सेल्फ ट्रस्ट – आपण परिपूर्ण आहोत, सर्व विचारांची आणि कृतीची जबाबदारी घेऊ शकतो हा विश्वास.
✳️ Autonomy – आपण कसे वागावे हे ठरवण्याचा अधिकार.
✳️ Environmental mastery – आपल्या प्रयत्नांनी आपल्याला हवे असलेले बदल होतील हा विश्वास.

हे मुख्य 5 घटक आहेत ज्यांनी आपला स्वतःवरच विश्वास वाढीस लागतो, काही लोकांमध्ये 1 घटक कमी असतो तर काहींमध्ये पाचही घटकांची कमतरता असते. आपण कुठे कमी पडत आहोत हे समजून घेतले तर स्वतःमध्ये विकास करणे सोपे जाते. आता आपण कुठे कमी पडत आहोत हे कसे शोधवे ? तर पुढील प्रश्न स्वतःला विचारून पहा.

✳️ सेल्फ वर्थ – तुम्ही स्वतःची एक मनुष्य म्हणून किंमत करता का ?, तुम्ही कुणापेक्षा कमी नाहीत असा तुमचा समज आहे का ?

✳️ सेल्फ कॉन्फिडन्स – तुम्हाला तुमच्या स्किल्स, strength आणि कौशल्यावर विश्वास आहे का ?, तुम्हाला तुमच्या स्किल्स बद्दल अभिमान वाटतो का ?, तुम्ही घेतलेले निर्णय तुम्हाला पटतात का ?

✳️ सेल्फ ट्रस्ट – तुम्हाला तुमच्यावर विश्वास आहे का ?, तुम्ही जे बोलता ते नेहमी करता का ?

✳️ Autonomy – तुम्हाला जेव्हा जे करायचे असेल ते करता येते का ?, तुमचे ध्येय प्राप्त करण्यापासून तुम्हाला कुणीच अडवू शकत नाही असे तुम्हाला वाटते का ?

✳️ Environmental mastery – जेव्हा तुम्ही कोणती कृती करता तेव्हा त्यातून अपेक्षित रिझल्ट येतील असे तुम्हाला वाटते का ?, तुम्हाला हवे ते सर्व तुम्ही मिळवू शकता असा तुमचा समज आहे का ?

ज्या प्रश्नांची उत्तर नाही किंवा नकाराकडे कल असणारी होती ते घटक तुमचे कमकुवत आहेत आणि त्यावर काम करणे गरजेचे आहे.

आता आपल्या कमतरता तर कळल्या पण त्यावर काम कसे करावे ?

✳️ स्वतःशी सकारात्मक संभाषण करा.

वरील प्रश्नांना नाही असे उत्तर मिळाले की मग आपण आपल्या आतल्या आवाजाला उलट प्रश्न केले पाहिजेत, उदा. मी जे बोलते ते करतो का ? या प्रश्नाला नाही असे उत्तर असेल तर मग तुम्ही स्वतःला विचारले पाहिजे की असे का होत आहे ? तुम्ही स्वतःला सांगायला हवे की मी जे बोलेन ते सर्व पूर्ण करू शकतो आणि त्यासाठी माझी मेहनत करण्याची तयारी आहे.

असे सकारात्मक संभाषण स्वतःशी केल्याने आपण आपल्या मेंदूला सकारात्मक पद्धतीने डिझाईन करू शकतो म्हणजे तो आपल्यावर संशय घेणार नाही आणि सवयीने आपली विचारसरणी सकारात्मक होईल.

✳️ सेल्फ ट्रस्ट निर्माण करणे.

अनेकदा ट्रस्ट हा शब्द आपण दुसऱ्या व्यक्ती साठी वापरत असतो, पण आपला स्वतःवर देखील विश्वास असायला हवा. जसे कुणावर विश्वास असेल तर आपण त्यांच्याशी प्रामाणिक असतो, त्यांना महत्त्व देतो, आणि त्यांच्या बद्दल आपल्याला एक कॉन्फिडन्स असतो तसेच स्वतःबद्दल देखील आपण राहायला हवे.

पण अनेकदा आपल्याला स्वतःवर विश्वास ठेवणे कठीण जाते कारण आपण स्वतःशी प्रामाणिक नसतो, आपल्या चुका किंवा निर्णय निभावून नेण्याची आणि ते स्वीकारण्याची क्षमता आपल्यात नसते. त्याने आपल्यालाच त्रास होईल अशी आपली समजूत झालेली असते. याचे सोपे उदाहरण म्हणजे आपण स्वतःला अनेकदा म्हणतो की उद्या पासून व्यायाम सुरू करू पण तो उद्या कधीच येत नाही कारण आपण रोज व्यायाम करू शकू की नाही यावरच आपण ठाम नसतो. आपल्यात सातत्य नाही हे आपण स्वीकारत नाही त्यामुळे त्यावर काम देखील आपण करत नाही.

खालील सोपे मार्ग वापरून आपण आपला सेल्फ ट्रस्ट वाढवू शकतो.

✳️ जे बोलतो ते पूर्ण करायला शिका – याचा सामान्य अर्थ की अनेक ठिकाणी नाही बोलायला शिका, जे काम जमणार नाहीये ते उगाच स्वीकारू नका, नकार देण्याची कला आत्मसात करून घ्या, कुणालाही overcommit करू नका आणि जे ठरवले आहे ते कोणत्याही परिस्थिती मध्ये पूर्ण करा.

✳️ स्वतःशी प्रामाणिक रहा – आपण काय आहोत, आपल्यातील गुण आणि कमतरता कोणत्या यांचा विचार करा, तुम्हाला काय वाटते, कसे वाटते आणि तुम्हाला काय हवे आहे याचा मनापासून स्वीकार करा. लोकांना काय वाटते आणि काय हवे आहे हे बाजूला ठेवायचा प्रयत्न करा आणि स्वतःला किंमत द्या.

✳️ आपल्या मतांवर ठाम रहा – तुम्ही जे काही नीतिमूल्ये जपली आहेत त्यांच्याशी प्रामाणिक रहा, तुमच्या मनातून जे मत आहे त्यावर संशय घेऊ नका. ( मत बनवताना सर्व बाजूंनी विचार करून घ्या).

✳️ स्पष्टता – आपल्याला काय हवे आणि आपण काय आहोत या बद्दल स्पष्टता ठेवा, कोणत्या गोष्टी तुम्ही मनापासून करता आणि कोणत्या जबरदस्ती किंवा दुसऱ्याचे मन राखण्यासाठी ते नीट समजून घ्या. त्यामुळे तुम्हाला काय हवे आहे ते समजून निर्णय घेणे सोपे जाईल.

नेहमीच स्वतःवर विश्वास ठेवणे म्हणजे आपले सेल्फ लव्ह वाढवणे किंवा आपले ध्येय प्राप्त करणे नसते. तर या उलट आपण काय आहोत आणि कुठे अडकलो आहोत हे समजून घेऊन सर्व घटकांचा अभ्यास करून त्यावर काम करणे असते हे आपण समजून घ्यायला हवे.

आशा करतो की तुम्ही सर्व यावर नक्कीच विचार कराल.

Need Help ? Talk to the expert now !

Counselling Psychologist
Scroll to Top