fbpx

Self esteem म्हणजे काय ?

images.jpeg
Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on skype
Share on whatsapp
Share on email
Share on print

माझ्या लेखनात बरेचदा सेल्फ esteem हा शब्द येतो, अगदी स्ट्रेस पासून डिप्रेशन पर्यंत सर्वच गोष्टींना कारणीभूत असणारा हा घटक आहे.

हेल्थी self esteem चा प्रभाव आपल्या मानसिक स्वास्थ, जीवनावश्यक प्रेरणा (मोटिवेशन) म्हणजेच आपल्या जीवनाच्या गुणवत्तेवर होत असतो. Self esteem ची कमतरता किंवा अती Self Esteem दोन्ही खूप घातक असतात. स्वतःच्या गुणांचे योग्य अवलोकन समतोल आयुष्यासाठी खूप आवश्यक असते.

Self Esteem म्हणजे काय ?

सोप्या भाषेत सांगायचे तर सेल्फ esteem म्हणजे आत्मसन्मान.
आपल्या स्वतःची क्षमता आणि कौशल्ये यांचे मूल्यांकन ( Evaluation) म्हणजेच आपले सेल्फ esteem. किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचे तर परिस्थिती लक्षात न घेता स्वतःवर केलेले प्रेम.

आपले Self Esteem हे खालील घटकांनी ठरवले जाते.
 • आत्मविश्वास ( Self confidence)
 • सुरक्षेची भावना ( Feeling of Security)
 • स्वतःची ओळख (Identity)
 • आपलेपणाची भावना ( Sense of belongingness)
 • सक्षम होण्यासाठीची तळमळ ( Feeling of competence)

रोजच्या आयुष्यात किंवा संभाषणात कधी कधी Self Esteem साठी self worth, self regard, आणि self respect हे शब्द सुद्धा वापरले जातात. लहानपणी प्रत्येकाची सेल्फ इस्टीम ही कमी असते, हळू हळू वाढीच्या काळात ती सुद्धा वृद्धिंगत होते. सेल्फ इस्टीम निर्मिती मध्ये स्वतःबरोबर आपल्या आजूबाजूच्या लोकांचें सुद्धा appriciation महत्वाचे ठरते.

Self Esteem खरच महत्त्वाची आहे का ?

Self Esteem आपल्या निर्णय क्षमतेवर, नात्यांवर, मानसिक स्वास्थ्यावर म्हणजेच एकूण जीवनावर खूप प्रभाव पाडत असते. आपले सेल्फ ईस्टीम आपल्या आयुष्यात प्रेरणा देण्याचे काम करते, ज्यांचा स्वतःकडे पाहायचा दृष्टिकोन हा सकारात्मक आहे ते लोक त्यांच्या क्षमता जाणून असतात, नवीन चॅलेंज घ्यायला ते उत्सुक असतात, ज्यांची सेल्फ इस्टीम चांगली असते त्या व्यक्तींमध्ये पुढील गुण आढळतात
 • स्वतःच्या क्षमतांची योग्य जाणीव.
 • दुसऱ्या व्यक्तींशी Healthy नाते संबंध जपणे. ( कारण त्यांचे स्वतःशी सुद्धा healthy नाते असते)
 • स्वतःकडून योग्य अपेक्षा ठेवणे.
 • स्वतःच्या गरजा समजून घेणे आणि त्या योग्य प्रकारे मांडणे.

या उलट सेल्फ इस्टीम ची कमतरता असणारे लोक स्वतःच्या क्षमतांवर सतत शंका घेत असतात, आपण घेतलेल्या निर्णयावर ते ठाम राहत नाहीत, कोणतेही नवीन चॅलेंज घेताना त्यांना योग्य प्रेरणा मिळत नाही कारण सतत ते स्वतःला capable समजत नाहीत. Relationship मध्ये सुद्धा ते स्वतःच्या गरजा आणि भावना नीट मांडत नाहीत, बरेचदा ते स्वतःला अयोग्य (Unworthy) आणि प्रेमासाठी नालायक समजतात.

अती सेल्फ इस्टीम असणारे लोक यांच्या उलट स्वतःला जास्त महत्व देतात, त्यांचे स्किल्स आणि ability या सगळ्यांपेक्षा खूप जास्त आहेत, आपण सर्वार्थाने परफेक्ट आहोत अस त्यांचा समज असतो. हे Relationship मध्ये dominant होतात किंवा Mr. / Miss. Perfect आहेत असे दाखवतात. आपण परफेक्ट आहोत हे फिलिंग असल्यामुळे यांची प्रगती खुंटून जाते.

Self esteem ला प्रभावित करणारे घटक :
 • वय
 • शारीरिक व्यंग / Disability
 • आनुवंशिकता / जनुकीय घटक
 • आजारपण
 • शारीरिक क्षमता
 • सामाजिक स्थिती
 • आर्थिक स्थिती
 • विचारांचे पॅटर्न
कोणत्याही गोष्टीवरून झालेला भेद ( रंग किंवा शारीरिक व्यंग, जात, धर्म) हा व्यक्तीच्या self esteem वर नकारात्मक प्रभाव पाडत असतो. जनुकीय घटक सुध्दा व्यक्तिमत्त्व विकासात महत्त्वाचे असतात परंतु आयुष्यात आलेले अनुभव आणि विचारांचे पॅटर्न हे सर्वात महत्त्वाचे घटक ठरतात. ज्यांनी सतत मित्रांकडून, परिवाराकडून किंवा शालेय जीवनात सतत नकारात्मक टिपण्णी, critisism अनुभवलं आहे त्यांची सेल्फ esteem आपोआप low होते या उलट ज्यांना त्यांच्यातील कमतरता यांची जाणीव न करून देता unconditional प्रेम दिले जाते त्यांचे सेल्फ esteem healthy होण्यास मदत होते.
उदा. शारीरिक व्यंग असूनही जर त्या व्यक्तीच्या घरच्यांनी तिला सतत appriciate केले, छोटे छोटे achievement साजरे केले तर त्या व्यक्तींमध्ये self esteem डेव्हलप होऊ लागते.

Healthy Self esteem

तुमची सेल्फ इस्टीम healthy आहे की नाही हे ओळखण्याच्या काही पायऱ्या :
 • भूतकाळातील नकारात्मक गोष्टींमध्ये तुम्ही कमी रमता.
 • तुम्ही सर्वांच्या बरोबर आहात असे फील करता, त्यांच्यापेक्षा चांगले ही नाही आणि वाईट ही नाही.
 • तुम्हाला स्वतच्या गरजा योग्य प्रकारे मांडता येतात.
 • रोजच्या जीवनात विश्वासाचा अनुभव तुम्हाला येतो.
 • आयुष्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टीकोन असतो.
 • तुम्हाला नाही म्हणण्याची कला अवगत असते.
 • तुमच्या क्षमता आणि कमतरता तुम्हाला माहित असतात आणि तुम्ही त्या स्वीकारता
हेल्दी self-esteem आपल्याला आपले ध्येय मिळवण्यासाठी प्रेरणा देते, आपल्याला आपल्या क्षमता माहीत असल्यामुळे आपण सहज आपले गोल ठरवू शकतो. तसेच रिलेशनशिप मध्ये सुद्धा योग्य बाउंड्री सेट करता येतात.

low Self esteem
ज्यांची self-esteem लो असते त्यांच्यामध्ये पुढील गुणधर्म दिसतात
 • तुमच्यापेक्षा दुसरे बेटर आहेत असा समज.
 • स्वतःच्या गरजा मांडताना संकोच वाटणे.
 • सदर आपल्या कमतरता यांचा विचार करणे.
 • सतत भीती वाटणे, स्वतःच्या निर्णयांवर शंका घेणे.
 • जीवनाकडे बघण्याचा नकारात्मक दृष्टिकोन असणे.
 • आपले आयुष्य आपल्या कंट्रोलमध्ये नाही असे वाटणे.
 • दुसऱ्यांच्या भावना किंवा गरजा यांना स्वतःपेक्षा जास्त महत्त्व देणे.
 • फियर ऑफ failure.
 • पॉझिटिव्ह फीडबॅक स्वीकारताना अडचण, सतत काळजी वाटणे.
 • कॉन्फिडन्स ची कमतरता.
सेल्फी esteem कमी असणाऱ्या लोकांमध्ये गोल अचीव करण्याची क्षमता कमी असते, रिलेशनशिप मध्ये सुद्धा अनेक अडचणी येतात, सेल्फ इस्टिम ची कमतरता असणाऱ्या लोकांमध्ये स्ट्रेस, एंजायटी, डिप्रेशन असे आजार लवकर डेव्हलप होतात. योग्य वेळी लक्ष न दिल्याने आत्महत्येचे सुद्धा विचार येतात.

Excessive(अती) Self-Esteem
बरेचदा अति सेल्फ ईस्टीम याचा संबंध Narcissistic पर्सनालिटी सोबत लावला जातो, पण Narcissistic पर्सनालिटी मध्ये समोरच्या व्यक्तीची सेल्फ ईस्टीम high आहे असा समज होतो पण ती परिस्थिती नुसार सतत कमी जास्त होत असते.
Excessive(अती) Self-Esteem असणाऱ्या लोकांमध्ये पुढील गुणधर्म आढळतात
 • स्वतःला परफेक्ट समजणे.
 • सतत बरोबर असण्यावर फोकस करणे.
 • आपण चूकच करू शकत नाही असा समज.
 • आपण सगळ्यांपेक्षा चांगले आहोत आणि स्किल्ड आहोत असा समज असणे.
 • मोठ्या मोठ्या आयडिया शेअर करणे. ( कल्पनाविलास)
 • स्वतःच्या आयडिया किंवा कन्सेप्ट ओव्हरइस्टिमेट करणे.
जेव्हा सेल्फ एस्टीम अति प्रमाणात वाढते तेव्हा रिलेशनशिपमध्ये खूप प्रॉब्लेम सुरू होतात, तसेच सामाजिक जीवनात कोणत्याही प्रकारचे criticism आपल्याला सहन करता येत नाही.

Self-Esteem improve कसे करावे.

सेल्फ एस्टीम आपण आयुष्याच्या कोणत्याही क्षणी improve करू शकतो, त्यासाठी खालील पायर्‍या नक्कीच उपयुक्त ठरतील.

 • नकारात्मक विचार – तुमची किंमत (worth) कमी आहे असे दाखवणारे विचार कुठून येतात ते शोधणे, त्यांना लिहून ठेवणे.
 • नकारात्मक विचारांना चॅलेंज करणे – जेव्हा तुम्हाला सतत वाटतं की तुम्ही नकारात्मक विचारांमध्ये गुरफटलेला जात आहात तेव्हा सकारात्मक बाजू लक्षात घेणे आणि त्या वर सकारात्मक विचारांनी मात करणे.
 • सकारात्मक सेल्फ टॉक – पॉझिटिव्ह affirmation चा वापर करणे.
 • स्वतःला माफ करायला शिका – भूतकाळात झालेल्या चुका स्वीकारून स्वतःला माफ करा म्हणजे तुम्हाला पुढे जाण्याचा रस्ता दिसेल.
 • छोटे छोटे गोल सेट करा आणि अचीव झाल्यानंतर ते सेलिब्रेट करा.
 • आपल्याला ज्या गोष्टींची भीती वाटत असेल त्यांना सामोरे जा.
 • आपल्या स्टोरीमध्ये स्वतःला हिरो बनवा – आपल्या मनामध्ये नेहमी आपणच स्वतः ची स्टोरी तयार केली असते त्यामध्ये आपण बरेचदा विलन चे कॅरेक्टर प्ले करत असतो तर त्या ठिकाणी स्वतःला हिरो बनवायचं.
 • आपल्या खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष द्या, त्यासोबत योग्य व्यायाम सुरू ठेवा.
 • रोज 10 मिनिटे स्वतःसाठी द्या, मेडिटेशन आणि प्राणायाम करा.
 • स्वतःची चांगली मैत्री करा आपले प्रॉब्लेम किंवा आपल्याला येणाऱ्या अडचणी आधी स्वतःची शेअर करा.

गरज पडल्यास आपल्या जवळच्या एखाद्या मित्रासोबत किंवा परिवारातील प्रिय व्यक्तीसोबत सर्व गोष्टी बोला, मार्ग सापडत नसल्यास तज्ज्ञांची मदत घ्या.

Need Help ? Talk to the expert now !

Counselling Psychologist
Scroll to Top