fbpx

Social Anxiety

20211028_114020_0000
Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on skype
Share on whatsapp
Share on email
Share on print

आपण एखाद्या कार्यक्रमासाठी बाहेर गेलो आहोत आणि आपल्याला खूपच uncomfortable वाटत आहे, सगळे आपल्याकडे लक्ष देऊन आहेत. आपण आता काहीतरी चुकीचे बोलणार/ वागणार किंवा कुणीतरी आपल्याला आपल्या करियर किंवा मार्क्स बद्दल प्रश्न करणार आणि सगळ्यांना आपल्याला बोलायचा चान्स मिळणार अशी भीती सतत वाटत असते. हीच भीती खूप वाढली की आपण social anxiety disorder चा शिकार होतो.

एखाद्या व्यक्तीला social anxiety का वाटते याचे कारण शोधून काढणे थोडे कठीण असते. एक मानसशास्त्रज्ञ म्हणतात की social anxiety म्हणजे आपले सर्व लक्ष आपल्या स्वरचित दोषांकडे घेऊन जाणे आणि वास्तव नाकारणे. स्वरचित दोष म्हणजे आपण आपल्या अस्तित्व, व्यक्तिमत्व आणि आयुष्य यांबद्दल केलेले गैरसमज. उदा. माझी उंची कमी आहे, मी दिसायला कुरूप आहे, मला कमी मार्क्स मिळाले आहेत, सगळ्यांपेक्षा कमी पगाराची नोकरी माझी आहे. हेच गैरसमज आपण जेव्हा सत्य समजून बसतो आणि लोक आपल्याला यावरून judge करतील आपली थट्टा करतील असा समज करून घेतो तेव्हा अशा लज्जास्पद घटना टाळण्यासाठी आपण कुठेही बाहेर जाणे टाळतो आणि येथूनच social anxiety निर्माण होते.

पण social anxiety पूर्णपणे चुकीची आहे असे देखील नाही, जेव्हा एखाद्या व्यक्तीची anxiety ट्रिगर होते तेव्हा तिला त्याचा फायदा देखील होतो. त्या व्यक्तीच्या मनात सहानुभूती आणि मदतीची भावना निर्माण होऊ लागते. एका रिसर्च नुसार social anxiety असणारे लोक हे symapthetic listerners असतात जे इतरांना समजून घेऊन त्यांना कंफर्ट देतात. त्यांच्या anxiety मुळे बाकी लोकांना तसे judgement ची भीती वाटू नये असे वातावरण ते तयार करतात.

अनेक लोकांना social anxiety चा खूप त्रास होत असतो. त्यांना लोकांमध्ये मिक्स व्हायचे असते पण anxiety मुळे त्यांना ते जमत नाही. मग यावर उपाय करायचे असतील तर आधी ट्रिगर आणि भीती ला चॅलेंज करावे लागेल. याची पहिली पायरी म्हणून स्वतःला पुढील प्रश्न विचारावे.

✳️ भीती किती वेळा वाटते ?
✳️ आधी कधी असा प्रसंग घडला आहे का ? जेवढा वाईट विचार केला होता तेवढा वाईट अनुभव आला होता का ?
✳️ तिकडे कोण कोण हजर होते ?
✳️ तुम्ही ज्या ग्रुप मध्ये आहात तो सतत तुमची मस्करी करत असतो का ?
✳️ तुमची मस्करी कोणत्या मुद्द्यावरून केली जात आहे ?
✳️ फक्त तुम्हालाच टार्गेट केले जात आहे की सर्वांचीच मस्करी केली जाते ?

या प्रश्नांची उत्तरे मिळाली की मग आपण त्या परिस्थिती ला सामोरे कसे जायचे हे ठरवू शकतो. आपण समोरच्या व्यक्तीला बदलू शकत नाही पण एखाद्या घटनेवर आपली प्रतिक्रिया देण्याची पद्धत बदलू शकतो.

प्रतिक्रिया बदलणे म्हणजे काय ?

आपल्याला social anxiety आहे पण तरीही आपण प्रतिक्रिया बदलायची म्हणून पार्टी साठी गेलो पण तिथे उगाच थट्टा नको म्हणून आपण लोकांना टाळायचा प्रयत्न केला आणि फोन मध्ये डोके घालून बसलो तर त्यातून निष्पन्न काहीच होत नाही आपले लक्ष फक्त  फोन मध्ये असते आणि आपण आजूबाजूला सुरू असलेले सर्व काही मिस करतो. त्यामुळे आपली प्रतिक्रिया बदलणे म्हणजे त्या ठिकाणीं जाऊन एकटे राहणे का ? तर अजिबात नाही.

प्रतिक्रिया बदलणे म्हणजे स्वतःला कठीण परिस्थिती मध्ये टाकणे आणि आपल्या स्वतःबद्दल असलेल्या गैरसमजुती दूर करणे. social anxiety बद्दलची प्रतिक्रिया बदलायची असेल तर आपल्याला त्या परिस्थितीचा सामना करावा लागतो. सोशल interaction आपल्याला वाटते तेव्हढे कठीण अजिबात नसते.

स्वतःबद्दल असलेले गैसमज कसे दूर करावे.

✳️ सत्य स्वीकारा

आपली आताची परिस्थिती ही कायमस्वरूपी असणार नाही. त्यामुळे कमी मार्क्स, कमी पगाराची नोकरी हे सर्व तात्पुरते आहे आणि ते स्वीकारण्यात अजिबात संकोच करू नका.

✳️ सेल्फ इमेज

स्वतःवर प्रेम करायला शिका, तुमचा बॉडी shape, वर्ण, उंची, वजन आणि कोणतेही व्यंग यावरून तुमचे स्वतःवरील प्रेम कमी होऊन देऊ नका. तुम्ही कसे वागता आणि तुमचे विचार कसे आहेत हे तुम्ही कसे दिसता याहून जास्त महत्वाचे आहे.

✳️ Comfort zone

आपला comfort zone तोडून बाहेर यायचा प्रयत्न करा. जोवर आपण आपले बिलिफ बदलत नाही तोवर आपण यातून बाहेर येणार नाही हे मनाशी ठरवून घ्या.

✳️ Perfection पाठी पळू नका.

आपल्याला अनेकदा परफेक्ट रहायचे असते त्यामुळे आपल्या प्रमाणे आपण परफेक्ट नसलो तर आपण बाहेर जाणे आणि लोकांमध्ये जाणे टाळतो. अश्यावेळी Perfection बाजूला ठेवले तर आपण सोशल anxiety वर सहज मात करू शकतो.

अन्य काही वैयक्तिक कारणे असतील तर तज्ज्ञांशी संपर्क करा.

Need Help ? Talk to the expert now !

Counselling Psychologist
Scroll to Top