fbpx

Social quotient

जीवन जगताना येणाऱ्या अनुभवातून, यश आणि अपयशातून आपण आपला social quotient म्हणजेच SQ विकसित करत असतो. Social quotient किंवा social intelligence हा आपल्या आयुष्याचा पाया आहे. सामान्य भाषेत यालाच आपण कॉमन सेन्स किंवा स्ट्रीट स्मार्टनेस असे देखील म्हणतो. तुमचा social quotient कसा आहे आणि त्याचे परिमाण कोणते हे आपण आजच्या लेखात समजून घेऊ.

✳️ संभाषण कौशल्य

Gathering किंवा पार्टी मध्ये अशी एक व्यक्ती असते जी सहज सेंटर ऑफ attraction होते, लोकांशी कसे बोलावे हे त्यांना छान अवगत असते. अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांशी ते सहज मिक्स होतात. अशा व्यक्तींचा social quotient हा इतरांच्या तुलनेत जास्त असतो. अशा लोकांमध्ये “social expressiveness” हे कौशल्य असते.

✳️ सामाजिक कर्तव्य आणि जबाबदारीची जाणीव

हॉटेल मध्ये गेल्यानंतर तिथे योग्य प्रकारे वावरणारे, किंवा कोणताही गेम खेळताना सर्व नियम काटेकोरपणे पाळणारे. सिग्नल असताना अगदी रस्ता मोकळा असेल तरी नियम न तोडणारे लोक हे देखील socially sophisticated असतात. त्यांचा social quotient जास्त असतो.

✳️ Listening ability

Social quotient उच्च असलेले लोक हे इतरांचे बोलणे चांगल्या प्रकारे ऐकून घेतात. त्यांच्याशी बोलताना आपली यांच्याशी जुनी ओळख आहे असे वाटते. कुणाशीही सहज मैत्री करण्याची क्षमता त्यांच्यात असते.

✳️ लोकांचे विचार आणि हावभाव समजून घेणे.

Social quotient उच्च असलेले लोक हे समोरच्या व्यक्तीला व्यवस्थित observe करतात. समोरचा कसे वागत आहे, काय हेतू ने बोलत आहे म्हणजेच त्याच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न हे लोक करतात. आपल्या आणि समोरच्याच्या भावना समजून घेणे हे emotional quotient चे लक्षण आहे. ज्यांचा EQ उत्तम असतो ते communication स्किल सोबत त्याचा वापर करतात.

✳️ सामाजिक भूमिका निभावणे

Social quotient जास्त असलेले लोक हे वेगवेगळ्या सामाजिक भूमिका योग्य प्रकारे निभावतात. मतदान करणे हे त्याचेच एक उदाहरण .

✳️ Impression management

ज्यांचा social quotient उच्च आहे ते लोक त्यांचे इम्प्रेशन कसे चांगले राहील याकडे लक्ष देतात. ते त्यांची image योग्य प्रकारे manage आणि control करतात. कुणालाही कधी कोणते रूप दाखवायचे हे त्यांना योग्य प्रकारे समजते. ही क्षमता social quotient चा सर्वात जटील भाग असते.

आपण आपला social quotient कसा विकसित करू शकतो ?

❤️ सातत्य, जिद्द आणि परिश्रम.
❤️ आपल्या भोवतालच्या म्हणजेच सामाजिक जीवनाकडे लक्ष देणे.
❤️ संभाषण कौशल्य विकसित करा. त्यासाठी काही ग्रुप किंवा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता.
❤️ Active listening हे कौशल्य शिकून घ्या. तुम्हीं जेव्हा समोरचा काय म्हणत आहे ते ऐकून घेता आणि तुमच्या बोलण्यातून रिफ्लेक्ट होते तेव्हा तुम्ही समजूतदार आहात हा समोरच्या व्यक्तीचा समज होतो.
❤️ सामाजिक परिस्थिती आणि तिथे तुमचे वागणे observe करा. कुठे तुम्ही सामाजिक शिस्त भंग केली आणि कुठे बदल करू शकता हे ठरवा. उदा. हॉटेल मध्ये मोठ्याने इंस्टाग्राम reels बघणे चुकीचे आहे ते टाळा.

आपली सामाजिक कर्तव्ये योग्य प्रकारे पार पाडणे म्हणजे उत्तम समाज निर्मिती साठी योगदान देणे हे समीकरण फारच आवश्यक आहे त्यामुळे आपण सर्वांनी social quotient विकसित करायला हवाच.

Need Help ? Talk to the expert now !

Counselling Psychologist
Scroll to Top