fbpx

STRESS – Change the mindset

समजा तुमचा दिवस खूपच दमवणारा होता. काम, परिवार आणि आर्थिक बाबी यांचे प्रेशर खूपच जाणवत होते. आता रात्र झाली तरीही झोप येत नाहीये. सतत कुस बदलणे सुरू आहे, उगाचच चिंता वाटत आहे पण यातून मार्ग काही सापडत नाहीये. स्ट्रेस मुळे स्वतःचा राग यायला लागला आहे. या सर्वांचा अनुभव आरोग्यासाठी खूपच हानिकारक असतो. वर सांगितलेली परिस्थिती जरी त्रासदायक आणि अपरिहार्य असली तरीही त्यातून होणारा त्रास हा आपण कमी करू शकतो.

स्ट्रेस चा नकारात्मक प्रभाव –

समजा की एखाद्या व्यक्तीला गुडघ्याचा प्रचंड त्रास आहे, खूपच जुनाट दुखणे आहे. त्यामुळे त्यांना रोजचे काम करताना देखील अडचणी येत आहेत. अगदी उठून पाणी घेणे हे सोपे काम करताना देखील त्यांना त्रास होत आहे, घरातील किंवा कामाच्या ठिकाणी उगाच चिडचिड वाढली आहे, एकदम असहाय्य वाटत आहे. या सगळ्यामुळे स्ट्रेस देखील वाढतो आणि परिणामी स्नायू वेदना आणि रक्तदाब कमीजास्त होणे सुरू होते एकूणच स्ट्रेस मुळे दुखणे अजून वाढते.

स्ट्रेस चा हा नकारात्मक प्रभाव अनेकदा आपल्याला अपरिहार्य वाटतो पण तो टाळता येण्या सारखा आहे.

आपण स्ट्रेस ला कसे react करतो हे दोन मुख्य गोष्टींवर अवलंबून असते.

✳️ आपल्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी
✳️ आपल्या शरीराने त्यांना दिलेला रिस्पॉन्स

आपण नेहमीच स्ट्रेस ला नकारात्मक गोष्ट म्हणून पाहतो, स्ट्रेस मुळे आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य खराब होते असा आपला गैरसमज झालेला आहे. रिसर्च नुसार या गैरसमजुती मुळे / नकारात्मक विचारामुळे स्ट्रेस चे शरीरावर विपरीत परिणाम होतात एवढेच नव्हे तर मृत्यू ची देखील शक्यता वाढू शकते.

विकासाची विचारसरणी

काही लोक हे स्ट्रेस असताना उत्तम काम करतात आणि स्वतःची भरभराट करून घेतात. त्याचा विकास होतो कारण त्यांची विचारसरणी वेगळी असते. त्यांना पूर्ण कल्पना असते की स्ट्रेस आणि रोज येणाऱ्या समस्या या अपरिहार्य आहेत, त्यांना वाईट न समजता चॅलेंज म्हणून स्वीकारले तर त्यातून नवीन संधी तयार होतील.

स्ट्रेस म्हणजे आयुष्यात येणाऱ्या नवीन बदलाची नांदी आहे असे स्वीकारले की आपली विचारसरणी सहज बदलू लागते. याच सकारात्मक विचारसरणीला growth mindset म्हणतात.

एखादी व्यक्ती/ वस्तू/ गोष्ट/ घटना आयुष्यात किती महत्त्वाची आहे यावर आपल्याला किती प्रमाणात स्ट्रेस फील होणार हे ठरते. उदा. एखादी व्यक्ती MPSC चा इंटरव्ह्यू देणार असेल आणि ते त्याचे ध्येय असेल तर त्याला येणारा स्ट्रेस हा जास्त असतो.

प्रत्येक वेळी स्ट्रेस ला त्रासदायक न समजता जर आपण growth mindset स्वीकारला तर आपल्याला त्यातून अनेक सकारात्मक निकाल मिळू शकतात. सोप्या भाषेत सांगायचे तर MPSC च्या इंटरव्ह्यू स्ट्रेस सकारात्मक पद्धतीने घेतला तर आपण त्यासाठी चांगली तयारी करू शकतो आणि आपले selection व्हावे म्हणून जीवतोड प्रयत्न करू शकतो.

स्ट्रेस मध्ये Growth mindset कशी मदत करतो ?

✳️ स्ट्रेस मुळे आपण समस्यांना आपल्याला संधी सारख्या वाटू लागतात.
✳️ कितीही स्ट्रेस असला तरीही स्वास्थ्य छान राहते.
✳️ स्ट्रेस मुळे नवीन गोष्टी शिकता येतात आणि विकास होतो.

एका हा mindset स्वीकारला की मग स्ट्रेस आपला मित्र आणि कोच होतो. तो आपल्याला नवीन चॅलेंज साठी तयार करतो. विकासासाठी  नवीन मार्ग खुले करून देतो. शरीरावर कोणताही विपरीत परिणाम न करता आपले स्वास्थ्य चांगले ठेवतो. आपण सतत स्वतःला आठवण करून देत असतो की “माझे शरीर मला कोणत्याही समस्येतून बाहेर पडायला आणि जिंकायला मदत करत आहे, मी या बदलासाठी तयार आहे. “

एका रिसर्च नुसार जेव्हा आपण स्ट्रेस संबंधी growth mindset निर्माण करतो तेव्हा आपली प्रोब्लेम solving ability वाढते आणि आपण अजून strong होतो.

आपण सर्वांनी मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपट पाहिला असेल, त्यात जेव्हा कॉलेज चे dean सांगत असतात की माझ्या हाताने मी अनेक ऑपरेशन केले हाथ कधीच कापला नाही पण जर माझ्या मुलीचे ऑपरेशन करायला गेलो तर माझे हात कापायला लागतील. याचे कारण काय तर आपण ज्या गोष्टीची कदर करतो त्यानाबद्दल येणारा स्ट्रेस देखील जास्त असतो.

आपल्या परिवाराचे स्वास्थ, त्यांचे आणि आपले आरोग्य, आपली जीवनशैली अशा अनेक गोष्टी आपल्यासाठी महत्वाच्या असतात. त्यामुळे त्यांना डिस्टर्ब करणारे काही झाले की आपण जास्त स्ट्रेस अनुभवतो. अश्यावेळी देखील सकारात्मक राहून विचार करणे गरजेचे असते. जी परिस्थिती आपण बदलू शकत नाही तिच्याशी लढून आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपण नक्कीच त्यावर विजय मिळवू शकतो. काही ठिकाणी आपल्याला भावना बाजूला घेवून थोडे खंबीर राहावे लागते.

Stress मधून विकासाकडे

स्ट्रेस एक catalyst म्हणून वापरणे शिकायला वेळ लागतो, ही एका रात्रीत होणारी प्रक्रिया अजिबात नाही. खालील सोपे मार्ग एकदा अवलंबून पहा.

✳️ स्वतःवर दया करा, स्ट्रेस बद्दल तुम्ही कसा विचार करत होतात आणि कसे वागले होतात त्यावरून स्वतःला शिक्षा देऊ नका.
✳️ Grattitude / कृतज्ञता ठेवा.
✳️ आपण आधी स्ट्रेस मध्ये कसे वागले होतात ते आठवून त्याचे आपल्यावर झालेले नकारात्मक परिणाम शोधा.
✳️ आपण जर आधी स्ट्रेस बद्दल सकारात्मक दृष्टीकोन ठेवला असता तर कोणत्या संधी आणि बदल आपल्याला अनुभवता आले असते तो विचार करा.
✳️ एखादी समस्या समोर आली की त्यातून कोणत्या संधी उपलब्ध होऊ शकतात आणि त्यातून आपला विकास कसा होईल ते बघायला शिका.

तुम्ही हे सहज करू शकता. जसे जसे तुम्ही यासाठी प्रयत्न सुरू कराल तुम्हाला चांगले रिझल्ट दिसणे सुरू होईल. तुम्हाला तुमचे बेटर version दिसायला लागेल. आपले आयुष्य म्हणजे आपल्याला मिळालेली एक भेट आहे यावर तुमचा विश्वास बसेल. स्ट्रेस आपला मित्र आहे हे तुम्हाला पटायला लागेल.

Need Help ? Talk to the expert now !

Counselling Psychologist
Scroll to Top