fbpx

स्ट्रेस आणि स्ट्रेस management !

images.jpeg
Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on skype
Share on whatsapp
Share on email
Share on print


#mentalhealth #mentalhealthawareness

एका बेडकाला एका पाण्यानी भरलेल्या पातेल्यात ठेवले आणि हळूच ते पातेल तापवायला सुरुवात केली, हळू हळू पाणी तापायला लागले पण बेडूक त्या परिस्थिती सोबत adjust होऊ लागला, थोड्याच वेळात पाणी उकळायला लागले बेडकाला ती उष्णता असह्य झाली पण तो बाहेर उडी मारूच शकला नाही आणि त्याने प्राण सोडला, कुठेतरी स्ट्रेस पण असाच आहे, हळू हळू आपण थोडा थोडा स्ट्रेस सहन करतो आणि मग प्रेशर तयार झाले की म्हणतो की मला सहन होत नाही. समजा आपल्याला पाणी हळू हळू तापायला लागले आहे हे आधीच कळाले तर ?

21व्या शतकात या कोविड मुळे स्ट्रेस चे प्रमाण प्रचंड वाढले आहे, त्यामुळे आपणच त्याला manage करायचे रस्ते सुद्धा शोधायला हवेत.

स्ट्रेस म्हणजे काय ?
आपल्याकडून असलेल्या अपेक्षा जेव्हा आपल्या वागणुकीतून पूर्ण होत नाहीत असे आपल्याला वाटू लागले अश्या वेळी आपले शारीरिक, मानसिक , behavioral रिस्पॉन्स बदलू लागतात आणि एक विचित्र प्रेशर मध्ये असल्याचा फील येतो त्यालाच आपण स्ट्रेस म्हणतो.

स्ट्रेस चे काही symptoms-

 1. झोप न येणे / खूप झोप येणे
 2. अचानक वजन कमी होणे किंवा वाढणे
 3. अंगदुखी
 4. एकटे राहण्याची इच्छा
 5. सहज irritate होणे
 6. मळमळ
 7. वारंवार पित्त होणे
 8. हाता पायांना घाम येणे
 9. दडपण
 10. Obsessive or Compulsive behaviors
 11. कामातील चुका लपवायला खोटे बोलणे
 12. जुगार किंवा प्रचंड शॉपिंग
 13. संशय घेणे
 14. दुसऱ्याच्या प्रगतीवर जळणे / critisize करणे

स्ट्रेस वाईटच आहे का ?

स्ट्रेस टाळता येत नाही, मी दोन प्रकारचे स्ट्रेस मानतो. एक positive आणि एक negative ( burnout)

Positive स्ट्रेस खरतर आपला एक मित्र आहे, आपल्याला प्रोटेक्ट करण्यासाठी किंवा येणाऱ्या संकटाची warning म्हणून स्ट्रेस खरच मदतगार राहिला आहे. एकतर पळून जाणे किंवा फाईट बॅक करणे हे कॉमन स्ट्रेस रिस्पॉन्स आहेत. स्ट्रेस जर योग्य वेळी आला तर तो आपला जीव सुद्धा वाचवू शकतो. एक छोटे उदाहरण – इंटरव्ह्यू आधी येणारे प्रेशर किंवा समोर एक जंगली जीव आला की पटकन पळून जाणे/ पाठी होणे हा क्विक रिस्पॉन्स.

पण negative स्ट्रेस मुळे आपल्या शरीरावर आणि मनावर विपरीत परिणाम होतात. स्ट्रेस जेव्हा आपल्याला manage होत नाही तेव्हा तो साचत जातो आणि burnout मध्ये कन्व्हर्ट होतो. बेडकाच्या गोष्टी मध्ये पाणी उकळलेली असह्य अवस्था ती हीच.

Burnout चे काही दुष्परिणाम / अती स्ट्रेस आपल्यासाठी कसा घातक आहे.

 1. हार्ट अटॅक, diabetes, anxiety and depression यांचा शिकार आपण होऊ शकतो
 2. हेअर लॉस
 3. Infertility problem
 4. मुरूम, पिंपल्स, स्किन related आजार
 5. हार्मोन imbalance
 6. सतत स्ट्रेस मुळे ब्रेन सेल्स damage होतात
 7. रक्ताच्या गुठळ्या / blood clotting

स्ट्रेस टाळता येत नसला तरीही बर्न आऊट ही अवस्था नक्कीच टाळता येते, खालील पायऱ्या यात नक्कीच मदत करतील.

 1. स्ट्रेस समजून घ्या.
  प्रत्येकाचा स्ट्रेस वेगळा असतो, त्यामुळे आपला स्ट्रेस कसा आहे ते समजून घेणं गरजेचं आहे.
 2. स्ट्रेस चा उगम / सोर्स समजून घ्या.
  आपल्याला स्ट्रेस कशामुळे येतोय ते समजून घ्या, फॅमिली, काम किंवा मित्र नेमके कशामुळे आपल्याला स्ट्रेस फील होतोय ते शोधा.
 3. स्ट्रेस सिग्नल जाणून घ्या.
  स्ट्रेस सगळ्यांचा वेगळा असतो म्हणून त्याचे सिग्नल पण वेगळे असतात, तुम्ही कधी irritate होता हे बघा. वरील पैकी कोणते symptoms आहेत ते लिहून ठेवा.
 4. तुम्ही स्वतः शोधलेले मार्ग.
  स्ट्रेस टाळता येत नाही त्यामुळे आपण अनेक मार्ग शोधलेले असतात जसे खूप स्ट्रेस आला की दारु पिणे, स्मोकिंग करणे, स्वतःच्या डोक्याने गोळ्या घेणे असे unhealthy पर्याय दूर करणे
 5. Healthy स्ट्रेस management stratergies वापरणे.
  Meditation, मित्रांशी गप्पा मारणे, गाणी ऐकणे, चित्रपट बघणे, पुस्तक वाचणे, चित्र काढणे, क्राफ्ट असे अनेक चांगले मार्ग आहे ज्याने स्ट्रेस कमी होतो. घरात किंवा ऑफिस मध्ये वातावरण सुगंधी ठेवणे, कमी मसाले असलेले अन्न खाणे, फ्रेश रंगाचे कपडे घालणे, असे अनेक मार्ग आपण वापरू शकतो.
 6. स्वतःच्या मेंटल health ला महत्त्व देणे.
  जेव्हा आपण स्वताला वेळ देतो तेव्हा आपोआप आपले स्वास्थ्य आपण दुसऱ्यांच्या आधी consider करतो, योग्य झोप, जेवण, आराम, व्यायाम हे सगळं केलं की स्ट्रेस आपोआप manage होतो.
  दूसरों की मदद करने से पहले खुद की हिफाजत करें !
 7. जेव्हा असह्य वाटेल तेव्हा मदत घ्या.
  जर अचानक दडपण येणे, हार्ट बीट सतत वाढणे असे काही जाणवत असेल तर प्रोफेशनल हेल्प घ्या. कुठलाही संकोच करू नका.

स्ट्रेस management साठी काही techniques, यांचे वर्गीकरण 3 गटात होते.

 1. Action oriented
 2. Emotion oriented
 3. Acceptance orientated

Action oriented

 1. ठाम रहा , आपल्याला काय हवे आहे आणि काय पटत नाहीये ते ठाम पणे सांगता यायला हवे, म्हणजे कुठेही आपली घुसमट होत नाही.
 2. downtime- दिवसातून काही वेळ स्क्रीन आणि सगळ्याच आवाजापासून वेगळे व्हा. थोडा वेळ एकदम शांत बसा याने चिडचिड कमी होते.
 3. Time management – वेळेचे नियोजन शिका, कामांना प्रायोरिटी द्या. वेळ manage केली की मग स्ट्रेस येत नाही.
 4. नियम बनवा – मनात नियम बनवायचे एक सीमा रेषा अखायची. दुसऱ्याकडून आपण कशी वागणूक स्वीकारू शकतो आणि कशी नाही. त्यामुळे आपला सेल्फ respect शाबूत राहतो. सेल्फ well being खूप महत्त्वाचे आहे. सोशल लाईफ जगताना स्वतःचे अस्तित्व गमावू नका.
 5. ब्रेक घ्या – बरेचदा आपल्या विचारांनी आपल्याला स्ट्रेस येत असतो, अश्यावेळी डोक्यात सुरू असलेले विचार कमी करायला आपले लक्ष divert करायचा. चित्रपट, वेब सीरिज, मित्रांना भेटणे, वॉक किंवा डेट असे इंटरेस्टिंग काहीतरी करावे

Emotion oriented

 • Affirmations and imagery – हा माझा आवडता मार्ग आहे, जेव्हा आपण सकारात्मक गोष्टी डोक्यात इमॅजिन करतो तेव्हा ब्रेन ते सत्य आहे म्हणून percive करतो, नकारात्मक गोष्टी सकारात्मक मध्ये कन्व्हर्ट होतात. affiemative sentences सुद्धा आपला mindset बदलण्यात मोठा रोल प्ले करतात.
 • 2.Cognitive Restructuring – CBT टॉक थेरपी ने negative गोष्टींचे कारण शोधून ते बदलणे
 • ABC Technique – यावर अधिक google वर मिळेल पण थोडी माहिती देतो.
  A– adversity, or the stressful event.
  B – beliefs, or the way that you respond to the event.
  C – consequences
  आपले बिलिफ आपण बदलले की आपली respond करायची पद्धत बदलते, आपोआप त्यातून येणारे रिझल्ट बदलतात. त्यामुळे सकारात्मक बिलिफ ठेवायचे म्हणजे रिझल्ट पण सकारात्मक येतील.

Acceptance oriented
ज्या परिस्थिती आपण बदलू शकत नाही त्यावर मात करायला ह्या पद्धती वापरता येतील.

 1. जेवण आणि व्यायाम – आपण जे खातो तसा आपला स्वभाव होतो, आपल्याकडे सात्विक, राजसिक आणि तामसिक असे अन्न प्रकार अस्तित्वात आहेत, त्यामुळे शक्य होईल तितका समतोल आहार घ्यावा. दारू आणि साखर कमी केल्यास anxiety कमी होण्यास मदत होते. व्यायाम सुद्धा mild डिप्रेशन आणि स्ट्रेस दूर करू शकतो.
 2. Meditation – योगिक श्वसन, प्राणायाम, योगनिद्रा, योगासने असे काही मार्ग आपल्याला रिलॅक्स करतात, meditation मुळे सेल्फ esteem आणि आंतरिक शांती वाढते.
 3. लवचिक बना- मोठ्या पावसात झाडे वाहून जातात पण गवतासारखी लवचिक वनस्पती टिकून राहते. तसेच आपण लवचिक राहिलो तर आहे ती परिस्थिती स्वीकारून त्यातून काही न काही शिकतो आणि पुढे जातो. याने बदलू न शकणाऱ्या परिस्थिती स्वीकारायची सवय लागते आणि स्ट्रेस कमी होतो
 4. मन मोकळे बोला – मनात साठवून उगाच त्रास करून घेऊ नका, जे लोक तुम्हाला क्लोज आहेत त्यांच्याशी बोला, असे बोलून आपले मन हलके होते 50% स्ट्रेस इथेच कमी होतो, बोलता येत नसेल तर ते लिहून ठेवा पण व्यक्त व्हा.
 5. व्यवस्थित आणि पूर्ण झोप – स्ट्रेस manage होण्यासाठी झोप पूर्ण असणे खूप गरजेचे आहे, आपण झोपलो की शरीर त्याला रिचार्ज आणि heal करते, जर झोप पूर्ण नसेल तर आपल्याला शारीरिक त्रास सुद्धा होऊ शकतो त्यामुळे व्यवस्थित झोप घ्या.

कामाच्या ठिकाणी स्ट्रेस कसा manage करावा यावर पुढील पोस्ट असेल.

Need Help ? Talk to the expert now !

Counselling Psychologist
Scroll to Top