fbpx

नुकत्याच ऑफलाईन शाळा सुरू झाल्या होत्या आणि आज सहामाही परीक्षेचा पहिला पेपर होता, अर्णव नववी मध्ये शिकणारा मुलगा, तसा फार active पण दीड वर्ष ऑनलाईन शाळा आणि परीक्षा अशी सवय लागल्याने अचानक ऑफलाईन परीक्षेची त्याला धास्ती वाटत होती. अश्यावेळी त्याच्यासोबत काय झाले आणि ती धास्ती कमी करण्याचे पर्याय आज आपण पाहू

अर्णव वर्गात बसला आणि त्याने लांब श्वास घेतला, खूपच चिंता वाटली की स्ट्रेस कमी करायचे मार्ग त्याचा ताई ने त्याला शिकवले होते. परीक्षक वर्गात आले आणि त्यांनी प्रश्न आणि उत्तर पत्रिका विद्यार्थ्यांना दिल्या, ते घेताना अर्णवच्या हाताला घाम आला होता, हृदयाचे ठोके वाढले होते. त्याने स्वतःला धीर द्यायचा प्रयत्न केला. तो सतत स्वतःला सांगत होता “तुझा अभ्यास झाला आहे, तू रात्रभर छान तयारी केली आहेस.” पण प्रत्येक सकारात्मक मेसेज नंतर मनातून एक आवाज येत होता “तू खरंच तयारी केली आहेस का ?, तू आधीच अभ्यास सुरू करायला हवा होता.” या सर्व विचाराने त्याचे डोकं सुन्न झाले होते. याच विचारात त्याने पेपर सोडवायला घेतला तिथे पण त्याचे मन लागत नव्हते, त्या वेळी सुद्धा परीक्षकांच्या चालण्याचा आणि घड्याळाचा आवाज त्याचे लक्ष वेधून घेत होते. कोणताही मोठा आवाज त्याला धडकी भरवत होता. त्याने या सर्व विचारात पेपर कसा आणि काय लिहिला हे त्यालाच कळले नाही आणि अश्या प्रकारे तो Test anxiety चा शिकार झाला.

अर्णव बद्दल जे झाले ते परीक्षेची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसोबत होत असते. परीक्षेची थोडी चिंता वाटणे योग्य आहे पण ती जास्त प्रमाणात असेल तर त्यामुळे आपण शारीरिक, मानसिक आणि भावनिक दृष्ट्या खचून जातो, दुर्बल असल्याची भावना मनात येते. या anxiety सोबत deal करायचे असेल तर आधी त्याचे पॅटर्न समजून घेणे गरजेचे आहे. Anxiety ने आपल्याला घायाळ करण्याआधी आपण तिचा फडशा पाडलेला केव्हाही चांगले.

Test anxiety कमी करण्याचे राजमार्ग

✳️ विचारसरणी बदला.

स्ट्रेस तुम्हाला तुमचा मित्र वाटतो की शत्रू ?, साहजिकच या प्रश्नाचे उत्तर बहुतांश लोक शत्रू असे देतात. कारण स्ट्रेस मुळे आपली झोप खराब होते, डोके दुखते, अन्न पाणी गोड लागत नाही. पण जर स्ट्रेस बद्दलचे आपले विचार आपण बदलू शकलो तर ? माझ्या मते स्ट्रेस हा आपल्याला मदत करणारा मित्र आहे, काही स्टडीज देखील म्हणतात की स्ट्रेस हा आपल्यासाठी प्रोब्लेम नाही. आपण स्ट्रेस ला कश्या पद्धतीने समजून घेतो आणि react करतो यावरून तो आपला मित्र किंवा शत्रू होणार हे ठरते. स्ट्रेस चे काम आपल्याला तयार करणे असते, पुढे ज्या अडचणी येऊ शकतात त्यांची कल्पना देऊन त्यावर मात करण्याची तयारी हा स्ट्रेस चा उद्देश असतो. जर आपण स्ट्रेस चे हे रूप स्वीकारले तर आपल्याला तयारी करताना मदत होईल. पाहिली पायरी म्हणून आपला स्ट्रेस बद्दलचा विचार बदलणे अत्यावश्यक आहे.

✳️ वेळेचे योग्य नियोजन करा.

आपल्याला खूप मोठा सिलाबस कमी वेळात पूर्ण करायचा असतो. अश्यावेळी योग्य नियोजन असणे खूपच आवश्यक असते. दिवसाचे टाइमटेबल बनवा आणि त्या स्टडी प्लॅन सोबत प्रामाणिक रहा. कोणत्या गोष्टी किती महत्वाच्या आहेत आणि कोणत्या सोप्या आहेत असे रिव्ह्यू करून योग्य नियोजन केल्यास कमी वेळेत अधिक पाठ्यक्रम पूर्ण होऊ शकतो. नियोजन करताना थोडा वेळ स्वतःसाठी देखील ठेवा.

✳️ स्वतःकडे लक्ष द्या.

❤️ पोटभर सकस आणि पौष्टिक अन्न सेवन करा. – कोणतेही काम करताना शरीराला ऊर्जेची आवश्यकता असते. ती ऊर्जा आपल्याला जेवणातून मिळते त्यामुळे या काळात घरचे सकस आणि पौष्टीक अन्न सेवन करा. शक्यतो बाहेरील खाणे/ junk food चा मोह टाळा. Anxiety कमी करण्यासाठी काही फळे जसे banana आणि orange तुम्ही खाऊ शकता.

❤️ शांत झोप घ्या. – कितीही चिंता वाटत असली तरी झोपेकडे दुर्लक्ष करू नका, शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी आणि आपण मिळविलेली माहिती ब्रेन मध्ये सेव्ह होण्यासाठी झोप खूपच महत्वाची आहे. त्यामुळे तुमच्या नियोजनात झोपेसाठी पुरेसा वेळ द्या.

❤️ शारीरिक हालचाली. – एकाच ठिकाणी बसून सतत अभ्यास करू नका. थोड्या वेळाने उठून चक्कर मारणे, गाणी ऐकणे, रोज व्यायाम करणे अशा हालचालींमुळे शरीराला ऊर्जा मिळते. आपल्या नियोजनात थोडा वेळ यासाठी राखीव ठेवा.

✳️ वर्तमानात जगा.

परीक्षेत काय होईल, मला पेपर कसा जाईल, ऐनवेळी की विसरून तर जाणार नाही ना ? असे भविष्यात येणारे प्रसंग आपल्याला अनेकदा चिंतित करतात. पण भविष्य हे उद्या येणार आहे त्यामुळे आजची मानसिक स्थिती खराब करू नका. पुढे काय होणार या भीतीने आजचे सर्व काम खराब होऊ शकते. Mindfulness हा सर्वोत्तम पर्याय आहे. जेव्हा खूपच डाऊन वाटेल किंवा भविष्याची चिंता सतावू लागेल तेव्हा गार्डन किंवा शांत ठिकाणी जा. वाऱ्याची मंद झुळूक, पक्षांचा आवाज अश्या ठिकाणी आपले लक्ष केंद्रित करा. योग किंवा प्राणायाम करून देखील तुम्ही स्वतःला रिलॅक्स करू शकता. दिवसातून एकदा सूर्यप्रकाशात नक्की जा.

✳️ स्वतःची काळजी घ्या.

मी कुठेतरी ऐकेले होते की “आयुष्य म्हणजे 10% घटना ज्या आपल्यासोबत होतात आणि 90% आपण त्यांवर कसे react करतो.”. स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतःशी सकारात्मक बोला, जेव्हा मेंदूला रोज सकारात्मक विचारांची सवय होते तेव्हा तो स्वतःवर शंका घेत नाही. रोज पुढील वाक्ये बोला.
❤️ मी कठीण परिस्थिती उत्तम प्रकारे हाताळतो.
❤️ परीक्षा खूप सोपी असते.
❤️ स्ट्रेस माझा मित्र आहे, तो मला सर्व चॅलेंज साठी तयार करतो.
❤️ माझे स्वतःवर खूप प्रेम आहे.

परीक्षार्थी मित्र मैत्रिणींना हार्दिक शुभेच्छा !

Need Help ? Talk to the expert now !

Counselling Psychologist
Scroll to Top