fbpx

रिकामे सल्ले ? मदत की त्रास

सल्ला देणे ही आपली सर्वात आवडती सवय असते. आपण कुणालाही सल्ला देताना त्यांची मदत करण्याचा आपला प्रयत्न असतो. एखाद्याला मार्गदर्शन मिळावे, काय योग्य, काय अयोग्य हे त्यांना समजावे म्हणून आपण अनेकदा समोरच्याने न मागता देखील सल्ला देतो. आपला उद्देश जरी चांगला असला तरीही न मागितलेला सल्ला हा त्रासदायक ठरू शकतो. असे सल्ले अनेकदा फुकटचे सल्ले समजले जातात, आज याच विषयावर आपण सखोल माहिती घेऊ.

रिकामे किंवा फुकटचे सल्ले म्हणजे काय ?

❤️ तुमचा मित्र एखाद्या ठिकाणी चालला आहे तर तुम्ही त्याला उगाच सांगणे की अरे ह्या नंबर चीच बस पकड, वेंधळेपणा करू नकोस. त्या मित्राचा समज होतो की तुम्ही त्याला बालिश आहे incapable समजत आहात.

❤️ तुमचे आणि तुमच्या girlfriend चे भांडण झाले आहे, ही गोष्ट तुम्ही मित्राला सांगता. पण तुमचा मित्र सांगतो की अरे ती मुलगी तशीच आहे. तुझी चॉईस चुकली, तू तिचा नाद सोडून दे. तुम्हाला यात judge झाल्या सारखे वाटते.

समोरची व्यक्ती तुम्हाला जेव्हा एखादी गोष्ट सांगत असते तेव्हा तिने न मागता तिला dominate करणारे किंवा दिशाभूल करणारे सल्ले देणे यांना आपण रिकामे किंवा फुकटचे सल्ले म्हणतो.

रिकामे सल्ले देणे चुकीचे का आहे ?

✳️ कुणाला गरज असताना सल्ले देणे हे त्यांच्या फायद्याचे असते पण रिकामे सल्ले हे खूपच त्रासदायक ठरतात.
✳️ सतत रिकामे सल्ले दिल्याने नाते खराब होण्याची शक्यता असते. आपल्या आयडिया आणि कॉन्सेप्ट बळजबरी कुणाच्या माथी मारणे हे चुकीचे असते.
✳️ रिकामे सल्ले देणारा व्यक्ती स्वतःला समोरच्या व्यक्तीच्या तुलनेत श्रेष्ठ समजत असतो. त्यामुळे त्याला अतिशहाणा देखील समजले जाऊ शकते.
✳️ रिकामे सल्ले देणारी व्यक्ती ही सतत कुरकुर करणारी व्यक्ती आहे असा अनेकदा समज होतो.
✳️ सतत सल्ले दिल्यामुळे समोरची व्यक्ती काय अयोग्य आणि काय योग्य हे सहज ठरवू शकत नाही.
✳️ आपण दिलेला सल्ला कुणीच consider करत नाही म्हणून सल्ले देणारे अनेकदा दुखावले जातात. त्यांना अस्वस्थ वाटू लागते.

आपण रिकामे सल्ले का देतो ?

आपल्याला अनेकदा प्रश्न पडतो की रिकामे सल्ले का दिले जातात ?

जेव्हा मी याचा अभ्यास केला तेव्हा मला पुढील कारणे जाणवली.
✳️ आपल्याला मदत करायची इच्छा असते.
✳️ आपल्याला जे योग्य वाटते तेच समोरच्याने करावे अशी आपली इच्छा असते.
✳️ आपल्याला सगळे माहीत आहे, आणि आपण सर्वांची मदत करू शकतो असा ओव्हर कॉन्फिडन्स.
✳️ कोणत्याही नवीन वस्तू बद्दल किंवा सेवेबद्दल अती आकर्षण आणि excitement
✳️ आपल्या प्रिय लोकांनी चुकीचे निर्णय घेऊ नये त्यांचे नुकसान होऊ नये ही चिंता.

सहअवलंबन (co- dependency) आणि रिकामे सल्ले.

समोरची व्यक्ती आपल्यावर अवलंबून आहे किंवा आपण सल्ला दिला, मध्यस्ती केली तरच त्यांचे काम होईल असा समज अनेकदा लोकांना सल्ले द्यायला भाग पाडतो. उदा. तुमचा मित्र दुचाकी विक्रेता आहे, तुम्ही त्याचा दुकानात उभे आहात आणि तिथे एक ग्राहक आला. तुमचा मित्र ग्राहकाला सर्व समजावून सांगत आहे पण तुम्ही मध्यस्ती करता आणि त्याच गोष्टी ग्राहकाला पुन्हा पुन्हा सांगता. तुमचा उद्देश मदत करण्याचा असतो पण त्यातून मित्राची देखील लिंक तुटते आणि त्याचे नुकसान होण्याची शक्यता असते. जर तुमचा मित्र हा कमजोर आणि इन्फ्ल्यून्स मध्ये येणारा असेल तर तो कोणतेच काम करण्यात समर्थ नाही असा त्याचा समज होऊ शकतो.

रिकामे सल्ले म्हणजे आपण सीमारेषा ओलांडत आहोत असे समजणे गरजेचे आहे. जेव्हा असे सल्ले दिले जातात तेव्हा तुम्ही कुणाच्या तरी आयुष्यात गरजेपेक्षा जास्त हस्तक्षेप करत आहात असे समजून जावे.

रिकामे सल्ले देणे कसे टाळावे ?

जर तुम्हाला कुणी त्यांचे प्रोब्लेम सांगत आहे तर त्या व्यक्तीला कुणीतरी ऐकून घेणारे हवे आहे. तुम्ही त्यांना judge न करता समजून घ्यावे असा त्याचा उद्देश असतो. त्यांना तुमचे सल्ले ऐकण्यात स्वारस्य नसते. त्यामुळे सरळ सल्ले देणे टाळा. उलट विचार की तुला मी कशी मदत करू ?
जर तुम्हाला कुणा मित्राला sales किंवा अन्य ठिकाणी मदत करायची आहे तर त्यांना ती गरज आहे का असे विचारून घ्या. मगच मध्यस्ती करा.

यासाठी तुम्ही त्यांना काही प्रश्न विचारू शकता. जसे
❤️ माझ्याकडे काही कल्पना आहेत ज्या तुमची मदत करू शकतात, सांगू का ?
❤️ तुला सल्ले हवे आहेत का ?
❤️ मी तुला सल्ला दिलेले तुला आवडेल का ?
❤️ मी अशी परिस्थिती अनुभवली आहे, मी त्यात कसा मार्ग शोधला हे ऐकायला आवडेल का ?
❤️ मी तुझी मदत कशा प्रकारे करू ?

कदाचित मी सांगत आहे एवढे सोपे हे नाही, यासाठी प्रयत्न करावे लागतील.

जेव्हा कधी सल्ला देण्याचा विचार मनात येईल तेव्हा पटकन स्वतःला खालील प्रश्न विचारावे.

❤️ मी आता सल्ला का देत आहे ?
❤️ सल्ला न देता मी कोणत्या अन्य पद्धतीने मदत करू शकतो का ?
❤️ मी समोरच्याला त्याचे प्रोब्लेम solve करायला संधी द्यावी का ?
❤️ माझीच कल्पना आणि विचार योग्य नाहीत हे मी स्वतःला कसे पटवून सांगू ?
❤️ मी सल्ला न देता सुद्धा कसा सपोर्ट करू शकतो ?
❤️ समोरचा माझ्या मदतीशिवाय देखील सर्व काहीं करू शकतो का ?
❤️ मी माझा इगो दुखावणार नाही म्हणून काय करू शकतो ?

रिकामे सल्ले मिळाल्यावर कसे respond करावे ?

जर तुम्हाला सतत कुणीतरी रिकामे सल्ले देत असेल तर त्याला कसे respond करावे हे पटकन कळत नाही. समोरची व्यक्ती आयुष्यात किती महत्वाची आहे ह्यावरून आपण आपले reaction ठरवत असतो. पण व्यक्ती महत्वाची असली तरीही त्रासदायक सल्ले कमी व्हावे म्हणून आपण सरळ बोललेले कधीही चांगले असते. त्यासाठी सरळ आणि polietly बोलणे गरजेचे असते.

उदा.
❤️ मला तुझा सल्ला देण्यामागचा उद्देश कळला आहे पण मी आता सल्ला शोधत नसून कुणीतरी ऐकून घेणारे शोधत आहे. जिथे मला मन मोकळे करता येईल.
❤️ अरे नेहमी अशी मध्यस्ती नको करत जाऊस मला जर वाटले की मी कोणती वस्तू किंवा संकल्पना समोरच्याला पटवून देऊ शकत नाही तर मी स्वतःहून तुला विचारेन.

कुणी सतत असेल वागत असेल तर तुम्हाला त्यांना एकांतात समजावून सांगावे लागेल की यातून माझे नुकसान होत आहे, हे टाळायचा प्रयत्न कर. यातून तुमचे नाते खराब होणार नाही आणि त्यांची सवय देखील आटोक्यात येईल.

Need Help ? Talk to the expert now !

Counselling Psychologist
Scroll to Top