fbpx

लोक काय विचार करत असतील ? समज – गैरसमज

आपण समाजात वावरताना अनेक लोकांना भेटतो, कामानिमित्त किंवा सहजच अनेक लोकांशी बोलणे होते, आपण आपले मत मांडल्यानंतर समोरचा काय विचार करत असेल, त्याला काय वाटले असेल हा विचार सतत आपल्या मनात येत असतात. आपल्याला समोरच्या व्यक्तीचे मन वाचता येत नाही त्यामुळे अनेकदा समोरचा काय विचार करत असेल याचा अंदाज आपणच बांधत असतो, social perception बद्दल आपण काही मुद्दे आजच्या लेखात पाहू.

✳️ लोकांना आपण आपल्या समजुती पेक्षा जास्त आवडले असतो.

आपले कुणासोबत बोलणे झाले की मग आपण त्या संभाषणाबद्दल खूप बारीक विचार करतो, मी जरा जास्तच बोललो का ? माझे मत जास्त परखड तर नव्हते ना ? असे विचार मनाला त्रास देत असतात. पण समोरची व्यक्ती आपल्याला वाटते तितकी क्रिटिकल विचार करणारी नसते, उलट आपल्याला वाटते त्याहून जास्त प्रमाणात त्या व्यक्तीला आपण आवडलेले असतो आणि ती व्यक्ती आपली कंपनी एन्जॉय करत असते. या संकल्पनेला liking gap असे म्हणतात.

सगळ्यांना आपण आवडू अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे, पण समोरच्याला आपण आवडू की नाही या विचाराने स्वतःला त्रास न देता हे सर्व विसरून मोकळ्या मनाने गप्पा मारणे जास्त गरजचे आहे.

✳️ अनोळखी लोकांशी बोलणे देखील आपल्याला आनंद देणारे असते.

आपण अनोळखी लोकांशी बोलणे टाळतो, पण त्यांच्याशी बोलल्यानंतर अनेकदा आपल्याला एकदम छान आणि मोकळे वाटते. एका स्टडी नुसार लंडन मधील एका बस सेवेच्या ड्रायव्हर आणि कंडक्टर यांना एक टास्क देण्यात आले, त्यांनी प्रवासी लोकांना एकमेकांशी बोलायला किंवा त्यांच्याशी बोलायला तयार करायचे. प्रयोगांती असे लक्षात आले की जे लोक दुसऱ्याशी बोलले ते एकटे आणि शांत बसणाऱ्या व्यक्तीच्या तुलनेत जास्त खुश होते. हे रिझल्ट introvert आणि extrovert दोन्हींसाठी सारखेच होते.

जर तुम्हाला अनोळखी लोकांशी बोलायला संकोच वाटत असेल तर तुमचे विचार थोडे बदलून प्रयत्न करून पहा.

✳️ आपल्याला जे लपवायचे आहे ते लोक पाहिले नोटीस करतात असे नाही.

आपल्या चेहऱ्यावर एक मोठा पिंपल आहे आणि कितीही प्रयत्न केले तरी तो दिसतच आहे अश्या वेळी आपल्याला भीती असते की लोक आपल्यासोबत बोलताना पाहिले ते नोटीस करतील, आपली अती सेल्फ कोंशीयस फिलिंग सतत आपल्याला असे भासवत असते.

एका कॉलेज मध्ये काही विद्यार्थ्यांना एक विचित्र स्लोगन आणि चित्र असलेले टीशर्ट घालून यायला सांगितले आणि त्यांना बाकी विद्यार्थ्यांशी बोलायला सांगितले नंतर जेव्हा त्यांच्याशी बोललेल्या मुलांना विचारले की तुम्हाला त्यांचे कपडे आठवत आहेत का ? तर खूपच कमी लोकांनी ते टी शर्ट नोटीस केले होते. त्यामुळे इतर लोक आपल्या imperfections ना जास्त नोटीस करत नाहीत हे आपण लक्षात घ्यावे.

✳️ समोरचा आपल्याला जास्त judge करत नाही.

जेव्हा एखादी चुकीची घटना किंवा अपघात होतो, उदा. जिन्यावरून उतरताना पडणे किंवा शर्ट वर कॉफी सांडणे. तेव्हा आपल्याला वाटते की आजूबाजूचे लोक आपल्याला किती वेंधळा समजतील किंवा आपल्याला judge करतील. पण रिसर्च नुसार समोरची व्यक्ती आपल्याला जास्त judge करत नाही तर या उलट आपण स्वतःला जास्त judge करत असतो.

आपण स्वतःच्या चुका जास्त मोठ्या समजतो कारण लोक आपल्याला नकारात्मक प्रकारे judge करतील ही भीती असते.

✳️ लोक आपलं दिलेली compliment जास्त मनावर घेतात.

Genuine compliment मुळे सर्वांना छान वाटते, पण आपण अनेकदा compliment देणे टाळतो, एका स्टडी नुसार compliment दिल्याने समोरची व्यक्ती आपल्या बद्दल अधिक चांगला विचार करते. अनेकदा समोरची व्यक्ती गैरसमज करून घेईल आणि आपल्याला दोष देईल या भीतीने आपण compliment देणे टाळतो पण ही पद्धत बदलली तर अनेक सकारात्मक बदल होतात.

✳️ आपल्या मनात असलेले विचार सर्वांना सहज कळतात हा गैरसमज आहे.

आपण एखाद्या ठिकाणी बोलताना आपल्याला सतत चिंता वाटत असते की मनात असलेले विचार, भीती सर्वांना कळेल आणि सगळे आपल्याला judge करतील पण आपण आपल्या भावना, भीती आणि विचार सहज लपवू शकतो आणि जे काम करत आहोत ते सहज करू शकतो. आपण आतून दुःखी असलो तरीही समोरच्याला आपण नॉर्मल आहोत असे भासवू शकतो. आपल्या प्रोब्लेम मुळे कामात येणारा अडथळा दुर व्हायला मदत होते.

✳️ सगळेच लोक सोशल लाईफ एंजॉय करत नाहीत.

इंटरनेट मुळे आपण खूपच जास्त कन्फ्युज होत आहोत, अनेकदा शनिवार आणि रविवारी सोशल मीडियावर मित्रांचे स्टेटस, स्टोरी पाहून आपल्याला वाटते की आपण सोशल लाईफ एंजॉय करत नाही, आपण कितीही हुशार आणि hardworking असलो तरीही या FoMo मुळे आपण खूपच खिन्न होतो. पण सत्य परिस्थिती खूपच वेगळी आहे. आपल्या सारखे अनेक लोक आहेत जे वीकेंड घरात किंवा कामात घालवतात. त्यामुळे आपण एकटेच आहोत असा विचार करू नये.

आपण समाजात वावरताना अनेकदा स्वतःबद्दल अती विचार करतो आणि स्वतःला अती प्रमाणात judge करतो. हे कटाक्षाने टाळायला हवे. लोक किंवा समाज अनेकदा आपल्याला सकारात्मक नजरेने पाहत असतो फक्त आपण सुद्धा स्वतःला सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पाहायला हवे.

Need Help ? Talk to the expert now !

Counselling Psychologist
Scroll to Top