fbpx

workplace स्ट्रेस कसा handle करावा.

images (1).jpeg
Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on skype
Share on whatsapp
Share on email
Share on print

वर्कप्लेस स्ट्रेस चे काही symptoms :
 • शारीरिक – डोकदुखी, पोटदुखी, आळस, झोप आणि eating habit मध्ये बदल
 • Cognitive – Concentration कमी होणे, निर्णय घेता न घेणे, विचार बदलणे, विस्मृती ( गोष्टी सहज विसरणे)
 • भावनिक – चिडचिड, सतत डाऊन फील करणे, टेन्शन घेणे

Workplace stress साठी काही preventive मेजर्स.
कामाच्या ठिकाणी असणारा स्ट्रेस कमी करण्यासाठी Employee आणि Employer दोघांचे मिश्र efforts गरजेचे असतात.

Employer किंवा कंपनी स्ट्रेस कमी करायला काय करू शकते.
 • आपल्या स्टाफ साठी meditation आणि सोपे व्यायाम यांचे प्रशिक्षण
 • कामाच्या मध्ये ब्रेक देणे आणि सुयोग्य सुट्टी नियोजन
 • वर्कलोड चे नियोजन करणे
 • कामगारांचे स्किल डेव्हलपमेंट होईल असे काम देणे
 • सगळ्यांचे moral अप करायला सोशल interaction मेन्टेन ठेवणे
 • कामगारांचे मत विचारणे आणि सल्ले घेणे, healthy communication ठेवणे
 • कोणत्याही प्रकारचा भेद न करणे, इक्वल संधी देणे
 • आपल्या पॉलिसी मध्ये स्टाफच्या फॅमिली चा विचार करणे
 • workplace स्ट्रेस management साठी काही सत्र घेणे

पण समजा तुम्ही जिथे काम करत आहात तिथे असे वातावरण नसेल तर ??
अश्यावेळी वैयक्तिक स्ट्रेस management करणे हाच पर्याय उरतो.

कामाच्या ठिकाणी स्ट्रेस manage करायचे काही टिप्स
 • Realistic deadline सेट करा
 • योग्य वेळी लंच टाईम घ्या
 • योग वेळेत घरी जा
 • गरज असल्यास सुट्टी घ्या
 • आपले काम कामाच्याच ठिकाणी सोडून या
 • प्रोफेशनल संवाद ठेवा
 • कोणताही भेद/ discrimination सहन करू नका
 • आपले स्किल devlope करणारे प्रोग्राम जॉईन करा
 • परिवार आणि काम यांच्यात समतोल ठेवा

गेल्या 3 वर्षात अनेक कंपन्या स्ट्रेस managenent साठी प्रयत्नशील आहेत. एखाद्याची प्रॉडक्टिविटी ही त्याच्या health वर पूर्णपणे अवलंबून असते हे त्यांना सुद्धा कळले आहे.

स्ट्रेस कमी करण्यासाठी करायच्या काही activities
 • आपला स्ट्रेस समजून घेणे, गेल्या पोस्ट मधील स्ट्रेस समजून घ्यायच्या 7 पायऱ्या वाचा आणि स्वतःचा स्ट्रेस जाणून घ्या.
 • स्वतः चे परीक्षण – स्वतःचे विचार तिऱ्हाईत म्हणून समजून घ्या, स्वतःचे नोट्स घ्या. स्वताला judge करू नका पण थॉट वॉचिंग सुरू ठेवा. सोबतच आपले ज्ञानेंद्रिय तपासत रहा. रोज 1 मिनिट पुढील गोष्टींना द्या. 1. डोळ्यांनी आजूबाजूला bgha- रंग, शेप, लाईट. 2. आजूबाजूला येणारे आवाज ऐकून घ्या. छोटे छोटे आवाज नोटीस करा. 3. टेस्ट कडे लक्ष द्या. सर्व चवीचे अन्न खात रहा, 4. वेगवेगळे गंध – फुल किंवा अन्य गोष्टीने सुगंध मनात साठवा. 5. फील घ्या. आजूबाजूच्या वस्तूंना स्पर्श करा त्यांचे texture समजून घ्या.
 • मसाज – accupressure थेरपी मध्ये सांगितल्या प्रमाणे हातावरील काही भागांची हळू हळू मसाज करा त्यातून स्ट्रेस कमी होतो.
 • Music थेरपी – शांत आणि रिलॅक्स करणारे music एका. काही विशेष meditation music सुद्धा वापरू शकता.
 • स्ट्रेस detox schedule बनवा – काम बाजूला घेऊन, त्याचे विचार डोक्यातून काढून टाका आणि चांगल्या मेमरिज आठवा, आपल्या हॉबी जोपासा.
 • Deep Breathing – रोज 5 मिनिट दीर्घ श्वसन करा, प्राणायाम करणे सुद्धा उत्तम.
 • मॉर्निंग वॉक घ्या ते शक्य नसेल तेंव्हा visulization करा. 15-20 मिनिट नेचर मध्ये चालत आहात असे समजा किंवा youtube वर नेचर व्हिडिओ बघा.
 • आवडते गेम खेळा.
 • काही ग्रुप ॲक्टिविटी करा, छोटे ted talks किंवा काही मोटिवेशनल यूट्यूब व्हिडिओ बघा.

वर्क फ्रॉम होम मध्ये येणारा स्ट्रेस कसा manage करावा.

wfh कल्चर ने खूप विचित्र समस्या निर्माण केल्या आहेत. काम सुरू करण्याची आणि साइन ऑफ किंवा काम थांबवण्याची वेळ निश्चित नसते. ब्रेक किंवा लंच, डिनर साठी वेळ नक्की करता येत नाही, यामुळे वर्क आणि पर्सनल लाईफ यांना बॅलन्स बिघडतो. आपण खूप सहज distract होतो जसे घरी येणारे पार्सल, मध्येच फोन वर सोशल मीडिया वर टाइमपास करणे, टीव्ही पाहणे, गप्पा मारणे यातून आपली प्रॉडक्टिविटी कमी होते. आपल्याला आपले लिमिट ठरवता येत नाहीत, सोशल आयसोलेशन मुळे कधी कधी motivation ची कमतरता जाणवते. शारीरिक मेहनत कमी झाल्याने चंचलता वाढते. एकूणच आपल्याला काय होतंय ते कळत नाही

या परिस्थिती मध्ये स्ट्रेस कसा manage करावा ?
 • सगळ्यात आधी एक रूटीन बनवायचे – अगदी दिवसाची सुरुवात कधी आणि कशी होईल ते सुद्धा consider करायचं, आपण काम किती वाजता सुरू आणि बंद करणार ते ठरवायचं, जेवण आणि ब्रेक साठी टाईम, दर 1 तासाने एक 5 मिनिटाचा वॉक किंवा छोटे व्यायाम, प्रायोरिटी नुसार काम ठरवणे, टाईम manage करायला टेक्नॉलॉजी चा पूर्ण वापर करणे.
 • कामाची जागा फिक्स करणे, रोज एकच ठिकाणी कामाला बसने.
 • कामाच्या वेळा नक्की झाल्यावर फोन सायलेंट करणे किंवा त्याकडे कमी लक्ष देणं
 • थोड वेळ मित्रांसाठी काढणे, व्हिडिओ किंवा व्हॉईस chat ने शेअरिंग सुरू ठेवणे
 • स्वतःला reward करणे – एखाद काम पूर्ण झालं की ब्रेक घ्या, आवडीच चॉकलेट खा, सेल्फ affirmation recite करणे, मित्रांना वेळ देणे, व्यायामासाठी वेळ देणे.
 • नाही म्हणायला शिका – कामाच्या वेळेत बरेच अनावश्यक फोन येतात, समोरच्याला रुड वाटू नये म्हणून आपण हो बोलतो पण अश्यावेळी ठाम रहा आणि नाही बोलायला शिका. आपले काम सोडून अन्य काम आल्यास बॉस सोबत बोला थोड negotiate करा. बिनधास्त नाही म्हणायला शिका.
 • झोप खूपच महत्त्वाची आहे, झोपेच्या किमान 30 मिनिट आधी सगळे स्क्रीन time avoid करा, कामाचं टेन्शन नका घेऊ.
 • स्वतःची काळजी घ्या. योग्य व्यायाम, झोप, meditation, downtime, वामकुक्षी, आवडीची गाणी ऐकणे, परिवाराला / मित्रांना वेळ देणे थांबवू नका.

स्ट्रेस जरी टाळता येत नसला तरीही तो manage करता येतो म्हणून उगाच त्याचा बाऊ करू नका, योग्य नियोजन आणि स्वतःची काळजी घेतली की स्ट्रेस आपोआप कमी होतो.

Underemployment सुद्धा आपल्या स्ट्रेस चे मोठे कारण आहे, फक्त पगार म्हणून जात कोणतीही नोकरी स्वीकारली तर आपल्याला तिकडे सहज स्ट्रेस येतोच. म्हणून फक्त पगार चांगला आहे हा निकष ठेऊ नका, नोकरी मधून आपली प्रगती झाली पाहिजे हे विसरू नका.

Need Help ? Talk to the expert now !

Counselling Psychologist
Scroll to Top